Ravindra Dhangekar | "दौंडचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा" रविंद्र धंगेकरांची राहूल कुल यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:20 IST2023-03-23T21:15:02+5:302023-03-23T21:20:02+5:30
सर्वसामान्य जनतेने त्यांच्या व्यथा आमदारांपर्यंत कशा पोहोचवायच्या हाच मूळ प्रश्न असल्याची थेट टीका...

Ravindra Dhangekar | "दौंडचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा" रविंद्र धंगेकरांची राहूल कुल यांच्यावर टीका
यवत (पुणे) :दौंड तालुक्याचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती तालुक्यात असून आमदार कुठे तर मुंबईत. यामुळे सर्वसामान्य जनतेने त्यांच्या व्यथा आमदारांपर्यंत कशा पोहोचवायच्या हाच मूळ प्रश्न असल्याची थेट टीका कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांचे मूळ गाव यवतजवळील नाथाचीवाडी आहे. नाथाचीवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मतदानासाठी आमदार धंगेकर दौंड तालुक्यात आले होते. त्यांनी नाथाचीवाडी, यवत, भांडगाव, कासुर्डी गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत केले जात होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड आदी मान्यवर उपस्थित होते. धंगेकर यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. पुढे बोलताना त्यांनी दौंड म्हणजे माझे हृदय आहे. त्यामुळे दौंडमधील नागरिकांना या मागील काळात तर उपलब्ध होतोच. मात्र, आता आमदार झाल्यानंतरदेखील कोणतीही कामे करण्यास कायम मदत करणार असल्याचे सांगितले.
भीमा पाटस कारखान्यामधील घोटाळ्याची पोल खोल करण्यासाठी लवकरच खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा दौंड तालुक्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असून याच सभेत कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा भव्य नागरी सत्कार दौंडच्या जनतेच्या वतीने करणार असल्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले.