अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात संघमित्राची उल्लेखनीय कामगिरी; बारामतीत कार्यकर्त्यांकडून थेट हत्तीवरून मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:51 IST2025-12-26T15:49:43+5:302025-12-26T15:51:01+5:30
केवळ २१ वर्षांच्या संघमित्रा चौधरी या युवतीने बसपा कडून निवडणूक लढवत नगरसेवक होण्याचा मान मिळवला आहे

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात संघमित्राची उल्लेखनीय कामगिरी; बारामतीत कार्यकर्त्यांकडून थेट हत्तीवरून मिरवणूक
पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवलं. बारामतीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षही राष्ट्रवादीचा झाला आहे. मात्र अजित पवारांच्या बारामती बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट धावला. अवघ्या एकवीस वर्षांची तरुणी नगरसेवक बनली. बारामतीतील प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा काळुराम चौधरी या विजयी झाल्या आहेत. केवळ एकवीस वर्षांची संघमित्रा यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांनतर तिचं सर्वत्र कौतुक होऊ लागल आहे. बारामतीत संघमित्राची बसपा कार्यकर्त्यांनी थेट हत्तीवरून मिरवणूक काढली.
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात या युवतीने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. ती सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असून तिला उत्तम ज्ञान असल्याचा विचार करत लोकांनी नगरसेवक बनवले. आता इथून पुढे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे. आपल्या प्रभागापासून सुरुवात करत विकासाची वाट धरणार आहे. अजित पवारांनी बारामती झोपडीमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
काळुराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे राज्याचे महासचिव असून मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वीही नगरपरिषदेसह विधानसभा व लोकसभेचीही निवडणूक लढवली आहे. यांना एकदाही यश मिळालं नव्हतं. पवार कुटुंबाचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या चौधरी यांच्या लेकीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. यंदा त्यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. बसपाच्या तिकिटावर चार ठिकाणी उमेदवार उभे केले. दिल्लीत वकिली करणाऱ्या मुलीला बारामतीत बोलावून घेत तिला उमेदवारी दिली. उच्चशिक्षित मुलीनेही दमदार भाषणे करत प्रभाग गाजवला. थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव तिने केला. वयाच्या २१ व्या वर्षीच ती नगरसेवक झाली आहे.
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात संघमित्रांची उल्लेखनीय कामगिरी; बारामतीत कार्यकर्त्यांकडून थेट हत्तीवरून मिरवणूक#pune#baramati#AjitPawar#bsp#nagarsevakpic.twitter.com/QO722BH3hz
— Lokmat (@lokmat) December 26, 2025
सगळ्या बारामतीकरांचं आभार व्यक्त करतो
मला बारामतीकर आणि माझ्या बहुजन समाज आहे. त्या बहुजन समाजानी जे माझ्या लेकीला आज विजयी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी प्रथमतः सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मतदारांचा हात जोडून आभार व्यक्त करतो. हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंपासून सुरू झालेला आहे. तेव्हा शाहू महाराज, बाबासाहेब कांशीराम आणि माझ्या लेकीला जे आहे हे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती. आकाश टीम बनायला देशात सुरुवात झालेली आहे. SC, ST, OBC सर्व मराठा बांधवांचं देखील माझ्या प्रभागामध्ये होती. मला त्यांनी सहकार्य केलं. त्या सर्वांचे आभार! - काळुराम चौधरी