Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून ४२८ क्युसेकने विसर्ग सोडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 19:01 IST2023-07-25T19:01:12+5:302023-07-25T19:01:12+5:30
धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ...

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून ४२८ क्युसेकने विसर्ग सोडण्याची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे पुणेकरांची तहान भागवणारे खडकवासलाधरण साखळीत पुरेसा पाणीसाठा जमा झाला आहे. आज (दि. २५) धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज सांयकाळी ७ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ४२८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे धरण प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.