Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:48 IST2026-01-16T11:47:41+5:302026-01-16T11:48:00+5:30

- सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असून मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

Pune Municipal Election Results 2026 Vasant More is trailing, tight fight in vote counting | Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

पुणे- पुण्यात सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान राजकीय वातावरण तापले असून प्रमुख उमेदवार वसंत मोरे सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असून मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

प्राथमिक निकालांनुसार प्रतिस्पर्धी उमेदवाराने आघाडी घेतली असून प्रत्येक फेरीत मतांचे अंतर कमी-अधिक होत आहे. वसंत मोरे समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली असून पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मतमोजणी केंद्रांबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. अंतिम निकालाकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले असून राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये स्पष्ट चित्र समोर येणार असून वसंत मोरे पिछाडी भरून काढणार की प्रतिस्पर्धी आपली आघाडी कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title : पुणे चुनाव 2026: वसंत मोरे पीछे, मतगणना में कांटे की टक्कर

Web Summary : पुणे चुनाव की मतगणना में वसंत मोरे पीछे चल रहे हैं; कांटे की टक्कर जारी है। शुरुआती रुझानों में उतार-चढ़ाव देखा गया, जिससे समर्थकों में उत्सुकता है। पुलिस सुरक्षा बनाए हुए है क्योंकि जिले को अंतिम नतीजों का इंतजार है।

Web Title : Pune Election 2026: Vasant More Trails, Close Contest in Counting

Web Summary : Vasant More trails in Pune's election count; a tight contest unfolds. Initial rounds show fluctuating leads, fueling supporter's anticipation. Police maintain security as the district awaits final results.