PMC Election Results 2026 : ‘हायव्होल्टेज' लढतीमध्ये तीन दिग्गज नेत्यांचा पराभव; पुण्यात ‘जायंट किलर’ ठरले नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:11 IST2026-01-18T13:11:10+5:302026-01-18T13:11:57+5:30

- अनेक प्रस्थापितांना आपले राजकीय बस्तान गुंडाळावे लागले आहे.

Pune Municipal Election Results 2026 Three veteran leaders defeated in 'high voltage' fight; New faces emerge as 'giant killers' in Pune | PMC Election Results 2026 : ‘हायव्होल्टेज' लढतीमध्ये तीन दिग्गज नेत्यांचा पराभव; पुण्यात ‘जायंट किलर’ ठरले नवे चेहरे

PMC Election Results 2026 : ‘हायव्होल्टेज' लढतीमध्ये तीन दिग्गज नेत्यांचा पराभव; पुण्यात ‘जायंट किलर’ ठरले नवे चेहरे

- हिरा सरवदे 

पुणे :
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढतींमध्ये नगरसेवकपदाचा दिर्घ अनुभव असणाऱ्या दिग्गजांसह मोठ्या नेत्यांच्या घरातील व्यक्तींचाही पराभव करत नवे चेहरे निवडून आले आहेत. यामुळे अनेक प्रस्थापितांना आपले राजकीय बस्तान गुंडाळावे लागले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. यामध्ये भाजपने १६५ पैकी सर्वाधिक ११९ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत प्रभाग ३६ मध्ये झालेल्या ‘हायव्होल्टेज' लढतीमध्ये तीन दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. या प्रभागातून चारही भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. सलग सहावेळा महापालिकेची निवडणूक जिंकणारे शिंदेसेनेचे उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल यांचे सातव्यांदा महापालिकेत जाण्याचे स्वप्न भंगले. त्यांचा पराभव भाजपचे महेश वाबळे यांनी केला.

माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या अश्विनी कदम यांचा शैलेजा भोसले यांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे (अजित पवार ) शहराध्यक्ष व माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनाही या प्रभागातून पराभवाचा सामना करावा लागला. तर या प्रभागातून भाजपने अवघ्या २२ वर्षीय सई थोपटे या कॉलेज तरुणीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. सई थोपटे हिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नीलम गांधी यांचा २ हजार २४१ मतांच्या फरकाने पराभव केला.

रवींद्र धंगेकर यांना या निवडणुकीत दुहेरी धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोनाली आंदेकर यांनी पराभव केला, तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये मुलगा प्रणव धंगेकर यांचा भाजपचे गणेश बिडकर यांनी पराभव केला.

तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव) मधील इ गटात भाजपकडून व्यंकोजी खोपडे, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक प्रकाश कदम आणि उद्धवसेनेकडून माजी नगरसेवक वसंत मोरे निवडणूक लढवत होते. कदम आणि मोरे यांचा पराभव करत भाजपचे खोपडे जायंट किलर ठरले. याच प्रभागात राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करून महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते संजय भोसले यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना प्रभाग ६ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे विशाल मलके या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. याशिवाय मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, काँग्रेसचे अविनाश बागवे, भाजपचे सुशील मेंगडे, रेश्मा भोसले, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर या अनुभवी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title : पुणे चुनाव परिणाम: दिग्गजों की हार, नए चेहरे बने 'जायंट किलर'

Web Summary : पुणे चुनाव में भाजपा का दबदबा, 119 सीटें जीतीं। हाई-प्रोफाइल हारों के बीच नए चेहरों ने अनुभवी नेताओं को हराया। एनसीपी, शिवसेना और भाजपा के प्रमुख नेताओं को मिली हार, जिससे विभिन्न वार्डों में नए चेहरों की जीत हुई।

Web Title : Pune Election Upset: Veterans Ousted, New Faces Emerge as Giant Killers

Web Summary : Pune's election saw BJP dominate with 119 seats. High-profile defeats marked the polls as newcomers ousted experienced leaders. Key figures from NCP, Shiv Sena, and BJP faced setbacks, paving the way for fresh faces and surprising victories across various wards.