PMC Election Results 2026 : तुरुंगातून लढवलेली निवडणूक ठरली यशस्वी; सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:50 IST2026-01-16T16:48:29+5:302026-01-16T16:50:19+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता.

Pune Municipal Election Results 2026 Sonali Andekar, who contested elections from prison, is in the lead; Tight fight in Pune Municipal Corporation elections | PMC Election Results 2026 : तुरुंगातून लढवलेली निवडणूक ठरली यशस्वी; सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी

PMC Election Results 2026 : तुरुंगातून लढवलेली निवडणूक ठरली यशस्वी; सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी

पुणे -  पुणे महापालिका निवडणुकीत यंदा अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने शहरातील आपली ताकद वाढवत अनेक प्रभागांत निर्णायक यश मिळवले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला उमेदवारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी थेट तुरुंगातून निवडणूक लढवली होती. मतमोजणी पूर्ण होताच या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

174 मतांनी लक्ष्मी आंदेकरांचा विजय
प्रभाग क्रमांक 23 मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी 174 मतांनी विजय मिळवला. त्यांच्यासोबत सोनाली आंदेकर यांनीही विजयी आघाडी घेतली.

प्रभाग 23 मध्ये समसमान निकाल
या प्रभागातून एकूण चार उमेदवार विजयी झाले असून, भाजपकडून विशाल धनवडे आणि पल्लवी जावळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी विजय मिळवला आहे.

तुरुंगातूनही जनतेचा विश्वास
तुरुंगात असतानाही आंदेकर भगिनींना मिळालेला जनतेचा कौल हा चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात जनाधार आणि स्थानिक प्रभाव किती महत्त्वाचा असतो, हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

उमेदवारीवरून राजकीय वाद
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला राजकीय संधी दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

 या आरोपांनंतर आंदेकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. “आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” अशी भावना कुटुंबातील महिला व मुलींनी व्यक्त केली. राजकारणात महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.   

Web Title : जेल से लड़ी NCP उम्मीदवारों ने पुणे PMC चुनाव जीता, विवाद.

Web Summary : जेल में रहने के बावजूद, एनसीपी की सोनाली और लक्ष्मी आंदेकर ने पुणे पीएमसी चुनाव जीता। जेल से उनकी जीत ने राजनीतिक बहस छेड़ दी और स्थानीय समर्थन के महत्व को उजागर किया। आपराधिक पृष्ठभूमि के आरोपों ने विवाद को बढ़ावा दिया।

Web Title : Jailed NCP candidates win Pune PMC election, sparking controversy.

Web Summary : Despite imprisonment, NCP's Sonali and Laxmi Andekar won Pune PMC elections. Their victory from jail has stirred political debate and highlighted the importance of local support. Accusations of criminal background fueled controversy after their win in ward 23.