Pune Mayor: पुणे, पिंपरी चिंचवडवर महिला राज करणार; सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:49 IST2026-01-22T12:49:00+5:302026-01-22T12:49:26+5:30

Pune PMC Mayor Reservation: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Municipal Election Results 2026 General women reservation for the post of mayor in Pune and Pimpri-Chinchwad; | Pune Mayor: पुणे, पिंपरी चिंचवडवर महिला राज करणार; सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव

Pune Mayor: पुणे, पिंपरी चिंचवडवर महिला राज करणार; सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव

PMC Mayor Reservation Lottery: पुणे महापालिकेवर भाजपची स्पष्ट सत्ता स्थापन झाल्यानंतर आता महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापौरपदाचीआरक्षण सोडत आज (गुरुवारी) जाहीर होत असून, यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात होते. मात्र, आरक्षण निश्चित न झाल्याने महापौरपदासाठीचे नाव जाहीर होण्यास विलंब होत होता. अखेर आज मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.

पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामुळे महापालिकेच्या नेतृत्वात महिला सत्तेची संधी निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत एससी महिला आणि ओबीसी पुरुष आरक्षण न निघाल्याने त्या वर्गातील इच्छुकांमध्ये नाराजी होती. मात्र, यंदाच्या सोडतीत सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत भाजपकडून अधिकृत महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर
 
1. छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण  (महिला)
2. नवी मुंबई:  सर्वसाधारण
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर:  सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई:  सर्वसाधारण
8. सोलापूर:  सर्वसाधारण
9. अमरावती:   सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी  (महिला)
11. नाशिक:  सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड:  सर्वसाधारण
13. पुणे:  सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर:  ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल:  ओबीसी
22. मीरा- भाईंदर:  सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड:  सर्वसाधारण
25. जळगाव:  ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण  (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी:  ओबीसी

Web Title : पुणे, पिंपरी-चिंचवड की महापौर होंगी महिलाएं; सामान्य वर्ग के लिए आरक्षित

Web Summary : पुणे और पिंपरी-चिंचवड में महिला महापौर होंगी क्योंकि सीटें सामान्य वर्ग के लिए आरक्षित हैं। पुणे में भाजपा के बहुमत से यह पद उनके पास रहने की संभावना है।

Web Title : Pune, Pimpri-Chinchwad Mayors to be Women; Reserved for General Category

Web Summary : Pune and Pimpri-Chinchwad will have women mayors as the seats are reserved for the general category. BJP's majority in Pune makes it likely they will hold the position.