PMC Election Results 2026 : पालिकेच्या सभागृहात १०२ नवे चेहरे; नव्यांमध्ये ६० महिला अन् ४२ पुरुषांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:57 IST2026-01-18T12:55:33+5:302026-01-18T12:57:20+5:30

- नवीन चेहऱ्यांत महिलांची संख्या ६०, तर पुरुष ४२ ; सभागृहात एकूण ८८ महिला, तर ७७ पुरुष

Pune Municipal Election Results 2026 102 new faces in the municipal hall; 60 women and 42 men included | PMC Election Results 2026 : पालिकेच्या सभागृहात १०२ नवे चेहरे; नव्यांमध्ये ६० महिला अन् ४२ पुरुषांचा समावेश

PMC Election Results 2026 : पालिकेच्या सभागृहात १०२ नवे चेहरे; नव्यांमध्ये ६० महिला अन् ४२ पुरुषांचा समावेश

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेच्या नव्या सभागृहात विविध पक्षांचे तब्बल १०२ नवीन आणि ६३ जुने चेहरे पाहायला मिळणार आहेत. या नवीन चेहऱ्यांमध्ये ६० महिला नगरसेविका आणि ४२ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केलेले आहे अशा अनुभवी नगरसेवकांना पहिल्यांदाच निवडून आलेल्या नव्या दमाच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना सोबत घेत महापालिकेचा कारभार हाकावा लागणार आहे.

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाल्यानंतर गेली आठ वर्षे निवडणूकच झाली नाही. त्या निवडणुकीत भाजप ९७, राष्ट्रवादी कॉंग्रेस ४२, शिवसेना १०, कॉंग्रेस ९ आणि अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. महापालिका सभागृहाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपल्यापासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. न्यायालयाच्या आदेशानुसार चार वर्षांपासून रखडलेली महापालिकेची निवडणूक अखेर झाली आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने ९९ पैकी ५३ माजी नगरसेवकांचा पत्ता कट करून ४६ जुने व नवीन असे १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या संयुक्त पॅनलसह शिंदेसेना आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे या पक्षांचे आव्हान होते. महापालिकेची निवडणूक चार पॅनल आणि अपक्षांमध्ये झाल्याने विरोधी मतांचे विभाजन होऊन सत्ताधारी भाजपचे मागील निवडणुकीपेक्षा अधिक म्हणजे ११९ नगरसेवक निवडून आले, तर दोन्ही राष्ट्रवादीचे ३०, काँग्रेस १५ आणि उद्धवसेनेचा केवळ १ नगरसेवक निवडून आला. शिंदेसेनेला आणि मनसेला भोपळाही फोडता आला नाही. निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये तब्बल १०२ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तर ६३ नगरसेवक यापूर्वी निवडून आलेले सदस्य आहेत. नवीन सदस्यांमध्ये ६० महिला आणि ४२ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे, तसेच यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेले अनुभवी नगरसेवक ५३ असून, यामध्ये २८ महिला आणि ३५ पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे अनुभवी नगरसेवकांना नवख्यांना सोबत घेऊन महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकावा लागणार आहे.
--------

सभागृहात पुरुषांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या जास्त -
महापालिकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्या १६५ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण देणे बंधनकारक असल्याने ८३ महिलांना प्रतिनिधीत्व मिळते. मात्र, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींनी पुरुषांपेक्षा जास्त महिलांना संधी उमेदवारी दिल्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेविकांचा टक्का जास्त आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ८८ महिला, तर ७७ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे.

--------
निवडून आलेले नवीन चेहरे व पक्ष

- भाजप - ४८ महिला - २७ पुरुष
- राष्ट्रवादी - ०६ महिला - ११ पुरुष
- काँग्रेस - ०६ महिला - ०३ पुरुष
* उद्धवसेना - ०० महिला - ०१ पुरुष

एकूण - ६० - ४२ पुरुष

----------
निवडून आलेले जुने चेहरे व पक्ष -

- भाजप - १९ महिला - २२ पुरुष
- राष्ट्रवादी - ०८ महिला - ०६ पुरुष
- काँग्रेस - ०१ महिला - ०५ पुरुष
- एकूण - २८ महिला - ३५ पुरुष

Web Title : पुणे नगर निगम चुनाव 2026: 102 नए चेहरे, महिलाओं का दबदबा

Web Summary : पुणे नगर निगम में 102 नए चेहरे आए हैं, जिनमें 60 महिलाएं हैं। बीजेपी 119 सीटों के साथ आगे है, उसके बाद एनसीपी और कांग्रेस हैं। अनुभवी सदस्यों को नए लोगों का मार्गदर्शन करना होगा। 165 सदस्यों के सदन में महिलाओं की संख्या पुरुषों से अधिक है।

Web Title : Pune Municipal Election 2026: 102 New Faces, Women Dominate

Web Summary : Pune's new municipal council sees 102 fresh faces, dominated by 60 women. BJP leads with 119 seats, followed by NCP and Congress. Experienced members must guide newcomers in governance. Women outnumber men in the 165-member house.