महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा

By राजू हिंगे | Published: April 19, 2024 02:20 PM2024-04-19T14:20:48+5:302024-04-19T14:25:23+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे...

Prime Minister Narendra Modi's meeting for Mahayutti candidates at the ground of SP Mahavighalaya in Pune | महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा

पुणे :पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडुन बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पुण्यात मुरलीधर माेहोळ, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

या चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

Web Title: Prime Minister Narendra Modi's meeting for Mahayutti candidates at the ground of SP Mahavighalaya in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.