PMC Elections : अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धवसेनेकडून ५२ उमेदवारांना एबी फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 20:30 IST2025-12-30T20:25:45+5:302025-12-30T20:30:07+5:30
शहरात काॅंग्रेस, उद्धवसेना आणि मनसे अशी आघाडी झाली आहे. यामुळे आघाडी भक्कम झाली आहे.

PMC Elections : अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धवसेनेकडून ५२ उमेदवारांना एबी फॉर्म
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी उद्धसेनेकडून ५२ उमेदवारांना एबी फाॅर्म वाटप करण्यात आले, अशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली. तसेच उद्धसेनेच्या कोट्यातील २३ जागा मनसेला देण्यात आले. यामुळे शहरात काॅंग्रेस, उद्धवसेना आणि मनसे अशी आघाडी झाली आहे. यामुळे आघाडी भक्कम झाली आहे.
महापालिका निवडणुकीत शहरात उद्धवसेनेसोबत काॅंग्रेस आणि मनसे सोबत आल्याने उद्धवसेनेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. शिवाय शेवटच्या दिवशी कात्रज भागातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही कार्यकर्ते उद्धवसेनेत प्रवेश केला. यामुळे या भागात उद्धवसेनेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. एकीकडे पक्षाला गळती सुरू असताना काॅंग्रेस आणि मनसे
सोबत आल्यामुळे आघाडी भक्कम झाली आहे. अर्ज दाखल करणाच्या शेवटचे दिवस असल्याने ज्या उमेदवाराला फाॅर्म देण्यात आले आहे, त्यांनी उत्साहाने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केले होते. परंतु शहरात भाजपची ताकद भक्कम आहे. यामुळे उद्धवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच भाजपसोबत साथ सोडल्यावर उद्धवसेना पहिल्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहे. ५२ एबी फार्म वाटले तरी अंतिम फायनल यादी ३ जानेवारीनंतरच कळणार आहे.