PMC Elections : निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने अस्मिता गाडीवडर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:31 IST2025-12-27T10:30:26+5:302025-12-27T10:31:13+5:30

पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोबंरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

PMC Elections news Asmita Gadivader suspended for not appearing for election work | PMC Elections : निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने अस्मिता गाडीवडर निलंबित

PMC Elections : निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने अस्मिता गाडीवडर निलंबित

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोबंरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेेची निवडणूक जाहीर झाली आहे.

त्यामुळे निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असून, याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४ मधील तरतूद राज्य निवडणूक आयोगाचे वेळोवेळी आदेश विचारात घेऊन विविध कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र काही कर्मचारी हे त्यांना नेमून न दिलेल्या कार्यालयांकडे हजर न झाल्याने निवडणूक विषयक कामामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

त्यामुळे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे नियुक्ती केली असताना कर्तव्यावर हजर राहिल्या नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत.

Web Title : पुणे नगर निगम चुनाव ड्यूटी: अनुपस्थित रहने पर इंजीनियर निलंबित

Web Summary : कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर को पुणे नगर निगम चुनाव ड्यूटी के लिए रिपोर्ट करने में विफल रहने पर निलंबित कर दिया गया। यह कार्रवाई अनुपस्थित कर्मचारियों के कारण हुई व्यवधानों के कारण की गई।

Web Title : Pune Municipal Election Duty: Engineer Suspended for Absence

Web Summary : Asmita Gadivadar, a junior engineer, was suspended for failing to report for Pune Municipal election duty. The action was taken due to disruptions caused by absent employees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.