PMC Elections : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By किरण शिंदे | Updated: December 27, 2025 11:49 IST2025-12-27T11:49:31+5:302025-12-27T11:49:56+5:30

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

PMC Elections Andekar gang leader Bandu Andekar to file nomination; Police tight security | PMC Elections : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

PMC Elections : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे - शहरातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर तसेच त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे.

पोलिसांच्या संरक्षणातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, काही वेळात बंडू आंदेकर यांना भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणले जाणार असून, त्यापूर्वीच परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आयुष कोमकरच्या आईची भावनिक विनंती

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती केली होती.'जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान अन्याय तरी करू नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. सत्ता होती म्हणून त्यांनी आजवर सर्व काही केलं. कृपया त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका' असे त्या म्हणाल्या.

तसेच, जो पक्ष आंदेकरांना तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेन. मला माझ्या गोविंदाला न्याय हवा आहे. एवढेच मला पाहिजे.. अशी भावनिक प्रतिक्रिया संजीवनी कोमकर यांनी व्यक्त केली होती.  या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, आज होणाऱ्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title : बदनाम गिरोह का सरगना आंदेकर कड़ी सुरक्षा के बीच PMC चुनाव नामांकन दाखिल करेगा।

Web Summary : हत्या के आरोप में हिरासत में बंद गिरोह का सरगना बंडू आंदेकर पुलिस सुरक्षा में अपना PMC चुनाव नामांकन दाखिल करेगा। अदालत ने रैलियों पर रोक लगा दी है। पीड़िता की मां ने आंदेकर की उम्मीदवारी के खिलाफ गुहार लगाई है, और किसी भी पार्टी द्वारा समर्थन करने पर आत्मदाह करने की धमकी दी है।

Web Title : Notorious gang leader Andekar to file PMC election nomination amid tight security.

Web Summary : Gang leader Bandu Andekar, in custody for murder, will file his PMC election nomination under police protection. Court prohibits rallies. Victim's mother pleads against Andekar's candidacy, threatening self-immolation if any party supports him.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.