PMC Elections 2026 : घायवळ अन् जैन बोर्डींग जमीन गैरव्यवहारावरून अजित पवारांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:27 IST2026-01-04T13:26:34+5:302026-01-04T13:27:47+5:30
कोथरूडमधील घायवळ हा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला, हे त्यांनी सांगावे. तसेच, जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डींगच्या जागेच्या गैरव्यवहारावरून मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला

PMC Elections 2026 : घायवळ अन् जैन बोर्डींग जमीन गैरव्यवहारावरून अजित पवारांनी साधला निशाणा
पुणे : उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी ‘जय जिनेंद्र’ म्हणत जैन बोर्डींग जमीन विक्रीतील गैरव्यवहाराची आठवण करून देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता प्रहार केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्ला चढवताना अजित पवार म्हणाले, कोथरूडमधील घायवळ हा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला, हे त्यांनी सांगावे. तसेच, जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डींगच्या जागेच्या गैरव्यवहारावरून मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला. एखाद्याच्या पतीने गुन्हा केला म्हणून त्याची पत्नी व कुटुंबीयांना गुन्हेगार ठरविणे योग्य नाही. बापू नायर या गुन्हेगाराच्या उमेदवारीवरून मोहोळ यांनी नायर याची उमेदवारी मित्र पक्षाने दिल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य टाळले.
ते पुढे बोलतांना म्हणाले, महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीनंतर सत्ताधारी राहिलेल्या पक्षांकडून गेली ९ वर्षे महापालिकेचा कारभार केला जात आहे. कारभारी त्रिकुटाच्या ठेकेदारांवरील प्रेमाने शहराच्या विकासाची गती मंदावली आहे. शहराचा विकास करायचा असेल, तर ‘त्रिकुट’ कारभारी बदला आणि माझ्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करत अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.