PMC Elections 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:53 IST2026-01-14T18:52:58+5:302026-01-14T18:53:20+5:30

नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे.

PMC Elections 2026: Action against those violating the rules of public holidays for voting | PMC Elections 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

PMC Elections 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

पिंपरी : मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवारी (दि.१५) जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तरीही काही खासगी कंपन्या, कारखाने व आस्थापने यांनी कामकाज सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे.

मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही सुटी लागू राहणार आहे. औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, निवासी हाॅटेल्स, दुकाने, मॉल्स, शाॅपिंग सेंटर्स, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास तेथे दोन ते तीन तासांची सवलत द्यावी. कोणतीही कंपनी किंवा आस्थापना मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी न देता कामावर बोलावत असल्याचे आढळल्यास, संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी अपर कामगार आयुक्त व कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी केले आहे.

Web Title : पीएमसी चुनाव: मतदान के लिए सार्वजनिक छुट्टी का उल्लंघन करने वालों पर कार्रवाई

Web Summary : पीएमसी चुनावों में मतदान के लिए अनिवार्य सवैतनिक अवकाश का उल्लंघन करने वाली कंपनियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। कर्मचारियों से श्रम आयुक्त कार्यालय में उल्लंघन की रिपोर्ट करने का आग्रह किया गया है। सभी प्रतिष्ठानों को मतदान के लिए पूरे दिन की सवैतनिक छुट्टी या 2-3 घंटे की छूट देनी होगी।

Web Title : Action against those violating public holiday rule for PMC Elections

Web Summary : Strict action will be taken against companies violating the mandatory paid holiday for voting in the PMC Elections. Employees are urged to report violations to the Labour Commissioner's office. All establishments must grant a full day's paid leave or a 2-3 hour concession for voting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.