PMC Election Results 2026 : पुण्यात उद्धवसेना-मनसेची युती फसली; ' इंजिन पडलं बंद..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 21:36 IST2026-01-16T21:23:13+5:302026-01-16T21:36:30+5:30

मनसे आणि उद्धवसेनेची युती होऊनही मनसेचे 'इंजिन' सुसाट धावण्याऐवजी बंदच पडण्याची नामुष्की मनसेवर ओढवली. मनसेला निवडणुकीत खातेच उघडता आले नाही.

PMC Election Results 2026 Uddhav Sena-MNS alliance fails in Pune 'Engine stalled | PMC Election Results 2026 : पुण्यात उद्धवसेना-मनसेची युती फसली; ' इंजिन पडलं बंद..!

PMC Election Results 2026 : पुण्यात उद्धवसेना-मनसेची युती फसली; ' इंजिन पडलं बंद..!

पुणे : महापालिका निवडणुकीत मुंबईप्रमाणे पुण्यातही प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धवसेनेची युती झाल्याने कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या होत्या. ही दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई होती. २०१७ मध्ये मनसेचे केवळ २ उमेदवार निवडून आले होते, त्यापेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र, मनसेला त्या दोन जागा देखील राखता आल्या नाहीत. मनसे आणि उद्धवसेनेची युती होऊनही मनसेचे 'इंजिन' सुसाट धावण्याऐवजी बंदच पडण्याची नामुष्की मनसेवर ओढवली. मनसेला निवडणुकीत खातेच उघडता आले नाही.

मनसेने ४१ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यातही प्रभाग क्रमांक २५ अ मध्ये मनसेच्या उमेदवार अमृता भोकरे व भाजपच्या उमेदवार स्वप्नाली पंडित यांच्यात चांगली लढत झाली. परंतु, ११ हजार ५०७ मतांनी पंडित यांनी बाजी मारली. त्यामुळे किमान १ जागा मिळण्याचे मनसेचे स्वप्न भंगले. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राम बोरकर, बाबू वागस्कर यांनाही मनसेचे धुरंधर होता आले नाही. थोडक्यात काय, पुणेकरांना उद्धव सेना आणि मनसेची युती फारशी रुचली नाही.

यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांनी सर्व लक्ष केवळ मुंबई महापालिकेवर केंद्रित केले होते. सुरुवातीला पुण्यात दोन्ही भावांनी प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याउलट पुण्यातील आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जाहीर सभा, प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला होता. त्या तुलनेत उद्धव सेना आणि मनसे पक्षाच्या उमेदवारांना कुणीच वाली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेच काय पण आदित्य ठाकरे देखील पुण्यात युतीच्या उमेदवारांसाठी फिरकले नाहीत.

किमान पक्षाची लाज राखण्यासाठी का होईना मनसे नेते राज ठाकरे यांनी निवडणूक मतदानाच्या दोन दिवस आधी धावती भेट देऊन मनसे उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या, मात्र पुण्याचे व्हिजन मांडण्याऐवजी राज ठाकरे यांनी अदानीचा विषय छेडून उमेदवारांची चांगलीच गोची केली. पुण्याच्या विकासाचे मॉडेल जर राज ठाकरे यांनी मांडले असते तर किमान एक दोन जागा तरी मिळाल्या असत्या, मात्र, पुण्याच्या महापालिका निवडणुकीत मनसेचा सुपडा साफ झाला. आता पुन्हा मनसेला उभारी मिळण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

Web Title : पुणे: पीएमसी चुनाव में उद्धव सेना-मनसे गठबंधन विफल; इंजन बंद!

Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में उद्धव सेना-मनसे गठबंधन सीटें जीतने में विफल रहा। मनसे अपनी पिछली दो सीटें भी नहीं बचा सकी। मुंबई पर ध्यान केंद्रित करने और देर से, बिना ध्यान के प्रचार के कारण हार हुई। पार्टी को उबरने में लंबा समय लगेगा।

Web Title : Pune: Uddhav Sena-MNS Alliance Fails in PMC Election; Engine Stalls!

Web Summary : The Uddhav Sena-MNS alliance failed to win Pune PMC seats. MNS couldn't retain even its two previous seats. Focus on Mumbai and late, unfocused campaigning led to their defeat. The party faces a long road to recovery.