PMC Election 2026 : निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:05 IST2026-01-01T16:04:41+5:302026-01-01T16:05:11+5:30
- सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई होत नसेल तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

PMC Election 2026 : निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
लोहगाव : येरवडा क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकारी कार्यालय परिसरात नगररोड क्षेत्रीय कार्यालयात पालिकेचा बिगारी कामगार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असल्याचे निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनात आणून देत आनंद गोयल यांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई होत नसेल तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय पालिकेच्या निवडणूक प्रभाग एक, दोन आणि सहा करिता कामकाज सुरू असताना सदर ठिकाणी नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील पालिकेचा बिगारी कर्मचारी गळ्यात पालिकेचे ओळखपत्र घालून येणाऱ्या उमेदवारांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचे निदर्शनात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्या निदर्शनास आणून देत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, असे लेखी पत्र देण्यात आले आहे. कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांना कळविण्यात आले आहे. त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात येईल. - सचिन बारावकर, निवडणूक निर्णय अधिकारी, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय