PMC Election 2026: पुण्यात बस, मेट्रो फुकट देताय; श्वास घ्यायला जागा द्या, सुबोध भावेंची प्रशासनावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:00 IST2026-01-15T12:00:08+5:302026-01-15T12:00:53+5:30
PMC Election 2026 नागरिकांचा 3 मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती झाल्या म्हणून विकास नाही होत. नवीन कन्स्ट्रक्शनमुळे अनेक समस्या वाढल्या आहेत.

PMC Election 2026: पुण्यात बस, मेट्रो फुकट देताय; श्वास घ्यायला जागा द्या, सुबोध भावेंची प्रशासनावर टीका
पुणे : पुण्यात अभिनेते सुबोध भावे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी मतदान करत रहा हा राष्ट्रीय हक्क असून तो बजावायलाच पाहिजे असे आवाहन माध्यमांशी बोलताना केले आहे. तसेच बस फुकट देताय, मेट्रो फुकट देताय यापेक्षा श्वास घ्यायला जागा द्या ती महत्वाच असल्याचं म्हणत प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
भावे म्हणाले, नागरिक विकासात नसतील तर विकास हा अंगावरच येणार आहे. फुकट द्यायचा असेल तर ग्राउंड द्या बाकी काही देऊ नका. शहरातील प्रत्येक माणसाचा चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे. नागरिकांचे जीवन सुसह्य करणं हे पहिलं काम आहे. बस फुकट देताय ,की मेट्रो फुकट देता यापेक्षा श्वास घ्यायला जागा द्या ती महत्वाच आहे. घटनेने मूलभूत अधिकार दिला आहे. मतदान करण्याचा तो आपण पाळला पाहिजे. आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आपलं कर्तव्य बजावून आपण बाहेर बसतो हे योग्य नाही. ज्या उमेदवारांना आपण निवडून देतो त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. उमेदवार काम करतात की नाही हे बघणं सुद्धा नागरिकांचे काम आहे. नागरिकांचा दबाव राजकारणींवर नसेल तर लोकांविरुद्ध तक्रारी करून काही उपयोग नाही. नागरिकांचा दबाव पुण्यात, राज्यात कुठेही दिसत नाही. पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चालले आहे. नगरसेवकांनी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य आहे. असं म्हटलं तर आपल्याला मतदान करण्याचा काहीही अधिकार नाही.
आपल्याला दिलेले आश्वासनं नगरसेवकांनी पूर्ण करण्याचा अधिकार आहे. नागरिकांचा 3 मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती झाल्या म्हणून विकास नाही होत. नवीन कन्स्ट्रक्शन वाढलं यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. विकास हा शहराचा गळा घोटून करायचा नसतो. मुलांना खेळायला ग्राउंड नाहीत जेष्ठ नागरिकांना फिरायला जागा नाहीत. आता मिळेल त्या जागेत फक्त बिल्डिंग उभा केल्या जातात. विकास हा माणसं जगण्यासाठी आणि जागवण्यासाठी असला पाहिजे. आता अपेक्षा केव्हाच संपल्या आहेत. मतदानापुरतं नागरिकांनी मर्यादित न राहता नागरिक एकत्र आले तर काही होऊ शकेल. मतदानाला लोक चांगली बाहेर पडलेत नागरिकांचा या सिस्टीम वरती असलेला विश्वास उडालेला नाही. आता लोकप्रतिनिधी सोबत आपल्यालाही काम करावे लागेल. मला अठरा वर्षे झाल्यानंतर मी एकही मतदानाचा हक्क बजावायचा सोडला नाही. त्यामुळे मतदान करत रहा राष्ट्रीय हक्क आहे मूलभूत हक्क आहे तो बजावायलाच पाहिजे.