PCMC Election Results 2026 : भाजपची दहा प्रभागांमध्ये ‘क्लीन स्वीप’, अख्ख्या पॅनेलचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:48 IST2026-01-18T17:42:14+5:302026-01-18T17:48:01+5:30

- प्रभाग क्रमांक २ ते २९ दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये एकतर्फी विजय

PCMC Election Results 2026 BJP clean sweep in ten wards, entire panel wins | PCMC Election Results 2026 : भाजपची दहा प्रभागांमध्ये ‘क्लीन स्वीप’, अख्ख्या पॅनेलचा विजय

PCMC Election Results 2026 : भाजपची दहा प्रभागांमध्ये ‘क्लीन स्वीप’, अख्ख्या पॅनेलचा विजय

- आकाश झगडे

पिंपरी :
महापालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातच खरी लढत झाली. अनेक प्रभागांमध्ये भाजपने राष्ट्रवादीचा पूर्णपणे धुव्वा उडवला. तब्बल १० प्रभागांमध्ये भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. 

दहा प्रभागांत चारही जागा, बारा प्रभागांत चारपैकी तीन जागा जिंकल्या

भाजपने प्रभाग क्रमांक २, ३, ४, ६, १०, ११, १५, २५, २६ आणि २९ मधील सर्व जागा खिशात घातल्या आहेत. प्रभाग ५, ७, १२, १३, १८, १९, २२, २३, २७, २८, ३१ व ३२ मध्ये भाजपने चारपैकी तीन जागा जिंकल्या.

तीन प्रभागांत एकही जागा नाही, तर तीन प्रभागांत एकेक जागाच

राष्ट्रवादीने (अजित पवार) काही प्रभागांमध्ये त्यांनी भाजपला पूर्णपणे रोखले आहे. प्रभाग क्रमांक ९, २० आणि २१ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला रोखत सर्व जागा जिंकल्या. प्रभाग १, १४ आणि ३० मध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. तेथे भाजपला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले.

दोन प्रभागांत दोन-दोन जागा

काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांत समसमान किंवा चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रभाग ८ आणि १७ मध्ये प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.

मतदारांनी भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २ ते २९ दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) काही ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून ठेवले असले, तरी भाजपच्या झंझावातापुढे त्यांना शहरावर पुन्हा पकड मिळवण्यात अपयश आले आहे. 

Web Title : PCMC चुनाव 2026: भाजपा ने दस वार्डों में किया क्लीन स्वीप

Web Summary : PCMC चुनाव में भाजपा का दबदबा रहा, दस वार्डों में पूर्ण जीत हासिल की। NCP (अजित पवार) ने कुछ वार्डों में जीत हासिल की, लेकिन भाजपा ने महत्वपूर्ण बढ़त हासिल की, खासकर वार्ड 2-29 में, जिससे NCP का शहर पर नियंत्रण बाधित हुआ।

Web Title : BJP Sweeps Ten Wards in PCMC Election 2026, Panel Wins

Web Summary : In the PCMC election, BJP dominated, securing complete victories in ten wards. NCP (Ajit Pawar) managed wins in some wards, but BJP gained significant ground, especially in wards 2-29, hindering NCP's city control.