PMC Election 2026 : पुण्यात सत्तांतर करण्याची गरज; आरक्षण अन् भ्रष्टाचाराचे पाप भाजपचे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:11 IST2026-01-09T10:11:25+5:302026-01-09T10:11:51+5:30
पुरोगामी विचारांशी प्रामाणिक असलेले प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात येऊन तत्त्वे जपली आहेत.

PMC Election 2026 : पुण्यात सत्तांतर करण्याची गरज; आरक्षण अन् भ्रष्टाचाराचे पाप भाजपचे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
वानवडी : भ्रष्टाचारापुढे हात टेकले असून जाहीरनाम्यानुसार सत्ताधाऱ्यांकडून कार्य होताना दिसत नाही. नवीन आधुनिक उद्योग महाराष्ट्र आले नाहीत. काँग्रेसच्या काळात पुण्याचा विकास झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले. पुरोगामी विचारांशी प्रामाणिक असलेले प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात येऊन तत्त्वे जपली आहेत. या निवडणुकीत पुणे महापालिकेत सत्तांतर करण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
वानवडीत आझादनगर भागात सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी वानवडी-साळुंखेविहार प्रभाग १८ मधील उमेदवार प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, शमिका जांभूळकर व साहिल केदारी यांना निवडून देत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
वानवडी आझादनगर भागात घरांवर आरक्षण टाकणाऱ्यांना मतदान करणार की आरक्षण काढणाऱ्यांना मतदान करणार, असा सवाल करून काँग्रेस पक्ष कधीही सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान करणार नाही. भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी व कर रूपी पैशावर सत्ताधाऱ्यांनी टाकलेला दरोडा हे पाप भाजपचे असल्याचे सांगून मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रशांत जगताप यांनी आझादनगर येथील जाहीर सभेत केले. यावेळी प्रभाग १८, १९ मधील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होता.