“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 05:41 IST2024-10-12T05:40:30+5:302024-10-12T05:41:49+5:30

येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू, असा निर्धार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला. 

now there is no telling who will be where in politics said sambhaji raje | “राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे

“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : राजकारणाची सध्याच्या नेत्यांनी बजबजपुरी केली आहे. कोण कुठे होता आणि कुठे असेल, काहीच सांगता येत नाही. राजकारणातील हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे. येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू, असा निर्धार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला. 

स्वराज्य पक्ष स्थापनेची घोषणा संभाजी राजे यांनी शुक्रवारी केली. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला राज्य सरचिटणीस धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भगव्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृह भरले होते. 


 

Web Title: now there is no telling who will be where in politics said sambhaji raje