NCP Sharad Pawar strongly criticized BJP Amit Shah at Baramati | Maharashtra election 2019 :ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं ते मला विचारतात ‘पवारसाब’ने क्या किया
Maharashtra election 2019 :ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं ते मला विचारतात ‘पवारसाब’ने क्या किया

पुणे : महाराष्ट्रात येऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात. शरद पवारांनी काय केले. हेच अमित शहा हे नाव पाच वर्षांपूर्वी कोणाला माहिती होते का ? ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं असा माणूस मला विचारतो ‘पवारसाब’ने क्या किया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.


बारामती येथे शनिवारी (दि. १९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगता सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाईल तिथे सांगतात. आमच्या समोर कोणी पैलवान नाही. त्यांना मी सांगू इच्छीतो, 'आम्ही रेवडी पैलवानासोबत कुस्ती खेळत नाही. सरकारच्या विरोधात कुणी मत व्यक्त केली की, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो. सरकारने उद्योगपतींचे ८१ हजार कोटींचे कर्ज स्वत:हून भरले. परंतू आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील सबंध तरूण वर्ग आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. मी जिथे गेलो, तेथे तरूणांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला.        

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • आमच्यात दम नसेल तर अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी फिरत होते 

 

  • मी ५२ वर्ष विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेतून निवडून येत असेल तर काहीतरी काम केलं असेल ना ? ५ वर्षांपूर्वी अमित शहा यांचे नाव तरी माहिती होते का ?

 

  • मी ईडीला येतो, येतो म्हणालो तर ते नका येऊ, नका येऊ म्हणाले. पोलीस प्रमुख येऊन आमचं  ठरलंय म्हणाले . 

 

  • सत्तेचा गैरवापर करायचा, विरोधकांना तुरुंगात टाकायचे ही भाजपची नीती. 

Web Title: NCP Sharad Pawar strongly criticized BJP Amit Shah at Baramati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.