पुण्यात बुधवारी दुमदुमणार 'नाद गणेश'; लोकमत आयोजित कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 18:48 IST2022-09-05T18:46:00+5:302022-09-05T18:48:03+5:30
लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत व न्याती ग्रुपच्या सहयोगाने कार्यक्रम...

पुण्यात बुधवारी दुमदुमणार 'नाद गणेश'; लोकमत आयोजित कार्यक्रम
पुणे : गणपती म्हणजे कला आणि गुणांचा अधिपती. या गणेशाला 'लोकमत'तर्फे बुधवारी (दि. ७) नाद गणेश' कार्यक्रमाद्वारे सुरांनी अभिवादन करण्यात येणार आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत व न्याती ग्रुपच्या सहयोगाने आयोजित लोकमत 'ती' चा गणपती बाप्पा संकल्प सिद्धीचा या उपक्रमांतर्गत नाद गणेश या सांगितिक पर्वणीचे आयोजन केले आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट, पिटारा आणि काका हलवाई स्वीटस् सेंटर, सिद्धी असोसिएटस् व सिद्धकला हे सहयोगी प्रायोजक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, आर्या आंबेकर आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुमधुर भक्तिसंगीतासह नाट्यसंगीताचा स्वराभिषेक अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. बुधवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका शनिवारपासून (दि. ३) पासून खालील ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
लोकमत शहर कार्यालय : व्हिया वेन्टेज, १ ला मजला, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड
लोकमत वडगाव: सर्वे नं. ३४ / अ वडगाव खुर्द, सिंहगड रोड, पुणे
खत्री बंधू पॉट आइस्क्रिम व मस्तानी : विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर
शिवाजी पुतळा चौक, कोथरूड
गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड
वनाज कंपनीसमोर
काका हलवाई स्वीट सेंटर्स-
कर्वे पुतळ्यासमोर सारथी सक्सेस स्वचेअर
एरंडवणे शॉप नंबर 1, अलंकार पोलीस चौकीजवळ
चितळे आइस्क्रीमसमोर टिळक रोड, सदाशिव पेठ
आयुर्वेद रसशाळेसमोर कर्वेरस्ता