विसर्जन मिरवणूक पार पडताच अभिनेत्रीने उचलले असे पाऊल की सगळ्यांनी केले कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 06:08 PM2019-09-13T18:08:48+5:302019-09-13T18:21:55+5:30

काल अनंत चतुर्दशीला संपूर्ण जगभरातील गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत प्रत्येकाने लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. त्याच निमित्ताने विसर्जन मिरवणूक संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मराठी अभिनेत्रीने हातात झाडू घेऊन रस्त्याची स्वच्छता केली.

this Marathi actress took the initiative that everyone appreciated. | विसर्जन मिरवणूक पार पडताच अभिनेत्रीने उचलले असे पाऊल की सगळ्यांनी केले कौतुक 

विसर्जन मिरवणूक पार पडताच अभिनेत्रीने उचलले असे पाऊल की सगळ्यांनी केले कौतुक 

Next

पुणे : काल अनंत चतुर्दशीला संपूर्ण जगभरातील गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत प्रत्येकाने लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. मात्र त्याच निमित्ताने विसर्जन मिरवणूक संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मराठी अभिनेत्रीने हातात झाडू घेऊन रस्त्याची स्वच्छता केली. तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या जात आहेत.  

  ही अभिनेत्री आहे, पुण्याची कन्या प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आज मिरवणूक संपल्यावर काही तासात रस्त्यावर उतरून विसर्जन मार्गाची स्वच्छता केली. यावेळी तिच्यासोबत काही स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या.  अनेकदा मिरवणूक मार्गावर खाल्लेल्या पदार्थांचे कागद, पताका, पाण्याच्या बाटल्या, तुटलेल्या चपला असा कचरा सर्रास टाकून दिला जातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी महापालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊनही कचरा उचलणे जिकरीचे काम होते. अशावेळी अनेक स्वयंसेवी संस्था स्वतःहून यात सहभागी होऊन मदत करतात. याच या=कामात आज प्राजक्ता सहभागी झाली होती. याबाबत ती म्हणाली, 'आपण सर्वांनी मिळून हे शहर स्वच्छ ठेवायला हवे. हे काम आपल्या सर्वांचे आहे आणि आपण ते करायलाच हवे. यापुढेही ते सर्वांनी एकत्र येऊन शहराचे आरोग्य राखायला हवे'. 

Web Title: this Marathi actress took the initiative that everyone appreciated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.