Maharashtra Election 2019 : वंचित कोणाला करणार आमदारकीपासून ''वंचित ''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 07:00 AM2019-10-18T07:00:00+5:302019-10-18T07:00:02+5:30

भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असली तरी लोकसभा निवडणुकीत वंचित विकासनेही येथे चांगली मते मिळविली होती़...

Maharashtra Election 2019 : Who will disadvantages by vanchit vikas aaghadi in assembly election | Maharashtra Election 2019 : वंचित कोणाला करणार आमदारकीपासून ''वंचित ''

Maharashtra Election 2019 : वंचित कोणाला करणार आमदारकीपासून ''वंचित ''

Next
ठळक मुद्देनगरसेवकांच्या नाराजीचा फटका बसेल? 

पुण्यातील शिवाजीनगर  मतदारसंघ हा युतीचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो़. येथे भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असली तरी लोकसभा निवडणुकीत वंचित विकासनेही येथे चांगली मते मिळविली होती़. झोपडपट्टी भाग भाजपाने गेल्या काही निवडणुकात आपल्याकडे वळविले होते़. आता तीच मते प्रामुख्याने वंचितकडे जात असल्याने ही मते कोणाला आमदारकीपासून वंचित करणार असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे़.  या मतदारसंघातील सर्व नगरसेवक भाजपाचे आहेत़. ही भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू असायला हवी होती़. मात्र, या नगरसेवकांच्या कामाविषयी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे़. त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे़. काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची नागरिक सध्याच्या भाजपा नगरसेवकांशी करताना दिसतात़. त्याचाही फटका बसू शकतो़. पक्षांतर्गत विरोधही दिसतो़.
दुसरीकडे भाजपाने निवडणुक सुरु झाल्यानंतर शहरातील सर्वात मोठी मेगाभरती शिवाजीनगरमध्ये घडवून आणली़. काँग्रेसबरोबरच शिवसेनेतील नेते, कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घेतले़. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे़. 
दुसरीकडे काँग्रेसमधून माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक जण गेल्याने नेते, कार्यकर्त्यांची उणीव जाणवत आहे़ सध्या काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते हिरीरीने पुढे असल्याचे दिसते़ 
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांना मतदारसंघातील झोपडपट्टी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे़. पूर्वी काँग्रेसचा असलेला हा मतदार भाजपाकडे गेला होता़. तो आता वंचितला प्रतिसाद देत असल्याने त्याचा किती फटका भाजपाला बसणार यावर येथील लढत किती रंगणार हे दिसून येईल़. 

नगरसेवकांच्या नाराजीचा फटका बसेल? 
भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात नागरिकांचे आंदोलन झाले होते़. तसेच पाणी व अन्य महापालिकेशी संबंधित प्रश्नांवरुन नागरिक नगरसेवकांना नाराज आहेत़. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर आहे, त्या कार्यकर्त्यांच्या बळावर ते लढत देत आहे़. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Who will disadvantages by vanchit vikas aaghadi in assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.