Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 03:54 PM2019-10-19T15:54:14+5:302019-10-19T16:08:48+5:30

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित..

Maharashtra Election 2019 : Mahayuti government will come once again in the state | Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

Next
ठळक मुद्देराज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेलजमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दिली दाद

चाकण : काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून काम करता आले नाही. म्हणून शिवसेना सत्ता चालवत होती. आणि संघर्षही करत होती. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. राज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेल. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभेला असलेली गर्दी लक्षात घेता सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजयी निश्चित झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. 
चाकण येथील खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे,यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश गोरे,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड,  सुलभा उबाळे, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, प्रकाश वाडेकरआदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांत जेवण देता येईल यासाठी हजार भोजनालये सुरु करण्याची आमची योजना आहे़ यामुळे  महिलांना रोजगार मिळेल़ उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण, शेतकºयांना शंभर टक्के कर्जमुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा देण्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ 
सुरेश गोरे म्हणाले, खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा करताना गुन्हेगारी निपटून काढली. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार प्रचारात सक्रिय झाले आहेत. मतदारांमध्ये गावोगावी  भीतीचे  वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्ती गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले़ 
.......
चाकणमधील सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अपक्षांना नाकारा असे आवाहन केले. नवमहाराष्ट्र घडविण्यात साथ देणार का? असा प्रश्न विचारला, यावेळी जमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. त्याचप्रमाणे खेड तालुक्यात निवडणूक काळात सुरु झालेली गुन्हेगारी या बाबत आणि खंबीरपणे जनतेच्या सोबत राहणार असल्याबाबत सेनेचे उमेदवार आ. सुरेश गोरे यांनी भाष्य करताच उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करीत वक्तव्यास दाद दिली.   

Web Title: Maharashtra Election 2019 : Mahayuti government will come once again in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.