महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 02:04 PM2019-10-22T14:04:55+5:302019-10-22T14:10:21+5:30

Pune Election 2019 : इंदापूर तालुक्यात तरुणांची गर्दी उल्लेखनीय..

Maharashtra Election 2019 : Indrapur, Baramati voting with enthusiastic voting everywhere | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देसंध्याकाळी उशिरापर्यंत रांगा पावसाने विश्रांती घेतल्याने मतदानाचा वेग वाढला

कळस : कळस व परिसरात ८० टक्के मतदान पार पडले. इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी कोणताही अनुचित प्रकार न  घडता शांततेत मतदान झाले. येथील जिल्हा कळस येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
कळस  व परिसरातील बिरंगुडी, बागवाडी, पिलेवाडी, गोसावीवाडी मध्ये एकून ५७१० मतदार होते. त्यामधील सुमारे ४५६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कळस एकूण मतदान २९८६ झालेले मतदान २१६९, बिरंगुडी एकूण मतदान ६११ झालेले मतदान ५२४, बागवाडी  एकूण मतदान ४४०   झालेले मतदान ३६२,गोसाविवाडी एकूण मतदान ८३६झालेले मतदान ७५६, पिलेवाडी एकूण मतदान ८३८ झालेले मतदान ७३८ असे मतदान झाले आहे दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती दुपारनंतर मतदान चांगले झाले कोणताही अनुचित प्रकार न घडता  शांततेत मतदान झाले. बोरी गावामध्ये एकूण ४७२७ मतदार होते यामध्ये ३७८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथे सुमारे ८० टक्के मतदान झाले आहे.
जंक्शन आनंदनगर ४७१० मतदार होते. यामध्ये २७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  येथे ५८ टक्के मतदान झाले आहे. कळंब गावात एकुण मतदान ६१३० होते यापैकी ४४८५ मतदान झाले आहे .७३.१६ टक्के आहे. अंथुर्णे गावात एकुण मतदान ४४३५ यापैकी ३५३९ याठिकाणी ८० टक्के मतदान झाले आहे. 
भरणेवाडी गावात ३४४५ मतदान यापैकी २९०० याठिकाणी ८४ टक्के मतदान झाले आहे. भादलवाडी गावात एकुण १७२६ मतदान होते.यापैकी ११०७ मतदारांनी म्हणजेच ६४ टक्के मतदान केले. जास्तीत जास्त मतदान आपल्याला घडून यावे ,यासाठीचे प्रयत्न शेवटच्या क्षणांपर्यंत सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
.........
कळस व परिसरात शांततेत८० टक्के मतदान
हर्षवर्धन पाटील यांचे बावड्यात मतदान
बारामती : भाजप महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी बावडा गावात मतदान केले. सकाळी दहा वाजता भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी भाग्यश्री, मुलगी जि.प.सदस्या अंकिता पाटील, पुत्र राजवर्धन, बंधू सरपंच किरण पाटील, उदयसिंह पाटील यांच्यासमवेत येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला . 
........
अकोलेमध्ये गर्दीमुळे काही काळ गोंधळ  
अकोले : अकोले (ता.इंदापूर) मध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. सकाळी पावसाच्या वातावरणामुळे गर्दी कमी होती. मात्र दुपारी एकनंतर लोकांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मोठ्या गर्दीमुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. दुपारी तीननंतर शांततेत मतदान केले. मतदानासाठी महिलांची संख्या जास्त होती. पाच वाजलेपासून पुन्हा गर्दी होऊ लागल्याने संध्याकाळी सहा वाजून गेल्यानंतरही मतदान सुरूच होते. वायसेवाडी,धायगुडेवाडी या ठिकाणी मतदान शांततेत सुरु होते.
.......
कळंब गावात ७३.१६ टक्के 
कळंब : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. एकूण ६ बूथवर ७३.१६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती झोनल अधिकारी व्ही. आर. बोधे यांनी दिली.
......
४कळंब गावठाण भागासह भोरकरवाडी, लक्ष्मीनगर, इंदिरानगर, मल्हारनगर आदी भागातील मतदान ३ बूथवर  प्राथमिक शाळेमध्ये झाले. लालपुरी येथे ३ बूथवर जानकरमळा, लालपुरी, फडतरेवस्ती, मोहितेमळा,जमदाडेवस्ती आदी भागातून मतदान झाले. 
.....
४मतदान केंद्रावर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या नादात मतदारांना दमबाजी केल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर होता.

Web Title: Maharashtra Election 2019 : Indrapur, Baramati voting with enthusiastic voting everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.