Maharashtra Election 2019 : Acknowledgment of development works worth over Rs 1200 crore: Bhimrao Tapkir | Maharashtra Election 2019 : बाराशे कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकासकामांची पोचपावती मिळेल : भीमराव तापकीर 
Maharashtra Election 2019 : बाराशे कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकासकामांची पोचपावती मिळेल : भीमराव तापकीर 

ठळक मुद्देबावधन, भुसारी काँलनी पदयात्रेद्वारा संपर्क

धनकवडी : मुंबई-बंगळुरु पश्चिम बाह्यवळण  महामार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपुलासाठी केंद्र आणि राज्याचे सव्वासहाशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे भीमराव तापकीर यांनी सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव  तापकीर यांनी बावधन, भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी व वारजे परिसरात पदयात्रा व दुचाकी रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधला. या वेळी रॅलीचे  चौकाचौकात  उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी सुनील मारणे, अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे पाठक, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे,  राजाभाऊ जोरी, अजय मोहळ, राजेश कुलकर्णी, गोरख दगडे, सागर कडू, समीर पाठक, शिवसेनेचे अविनाश दंडवते, पराग पासलकर, अरुणा मोखर, सीमा चिकणे, बाबा चिकणे,  उपस्थित होते.
......
तापकीर म्हणाले, वारजे भागात पाँप्युलरनगर उड्डाणपूल, विविध सोसायटी परिसरातील रस्ते, प्रस्तावित रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यासह खडकवासला मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत बाराशे कोटींपेक्षाही अधिक रकमेची विकासकामे झाली आहेत. विकासकामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असताना पदयात्रेमध्ये भेटणाऱ्या जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जातो. जनतेच्या स्वप्नातील खडकवासला मतदारसंघ साकारत असताना मतदार पुन्हा एकदा मला निश्चितच संधी देतील.
......

Web Title: Maharashtra Election 2019 : Acknowledgment of development works worth over Rs 1200 crore: Bhimrao Tapkir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.