Kasba By Election | कसब्यात अभिजीत बिचकुलेंचे खाते उघडले; किती मते मिळाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:34 IST2023-03-02T09:33:34+5:302023-03-02T09:34:57+5:30
या निवडणुकीत भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे....

Kasba By Election | कसब्यात अभिजीत बिचकुलेंचे खाते उघडले; किती मते मिळाली?
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामुळे उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये मविआच्या रविंद्र धंगेकर यांना ७ हजार ८४४ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या हेमंत रासने यांना २ हजार ८६३ मते मिळाली आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना फक्त चार मते मिळाली आहेत.