PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:33 IST2026-01-16T18:27:14+5:302026-01-16T18:33:57+5:30

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने प्रचाराच्या सभा घेत भाजपवर जोरदार टीका केली होती

In the uncle-nephew alliance, did uncle's party get the Bhopla or the seats? Important developments have come to light from Pune | PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड

PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काका-पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. मात्र या एकत्र येण्याचा थेट फायदा शरद पवार गटाला झाला की तोटा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आघाडी करत आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि मनसे स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी लढतीत रंगली होती.

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने प्रचाराच्या सभा घेत भाजपवर जोरदार टीका केली होती. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवत सत्ता दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवारांचे महापालिकेतील सत्तेचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार शरद पवार गटाचा केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रभाग क्रमांक १९ – कोंढवा खुर्द, कौसरबाग निकाल

या प्रभागात काँग्रेसचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.

निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे –

तस्लिम हसन शेख (काँग्रेस)

आसीया मणियार (काँग्रेस)

काशिफ सय्यद (काँग्रेस)

गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

या निकालामुळे पुण्यात काका-पुतण्यांची युती असूनही शरद पवार गटाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काळात ही युती कायम राहणार की नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे: पवार गठबंधन का प्रभाव अस्पष्ट; शरद पवार गुट को कम लाभ।

Web Summary : पुणे के स्थानीय चुनावों में पवार गुट एकजुट हुए, लेकिन शरद पवार के समूह को कम लाभ हुआ। बीजेपी ने जीत हासिल की, जिससे अजित पवार की महत्वाकांक्षाएं धराशायी हो गईं। कोंढवा खुर्द में कांग्रेस का दबदबा रहा, जबकि शरद पवार के केवल एक उम्मीदवार ने जीत हासिल की। भविष्य का गठबंधन अनिश्चित।

Web Title : Pune: Pawar alliance impact unclear; Sharad Pawar faction gains little.

Web Summary : Pune's local elections saw Pawar factions unite, but Sharad Pawar's group gained minimally. BJP secured victory, dashing Ajit Pawar's ambitions. Congress dominated Kondhwa Khurd, while only one Sharad Pawar candidate won. Future alliance uncertain.