'पहिला गणपती कसबा गणपती...' मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे अलका चौकात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 15:36 IST2022-09-09T15:33:43+5:302022-09-09T15:36:10+5:30
मोरया-मोरयाच्या आवाजाने अलका चौक दुमूदुमून निघाला...

'पहिला गणपती कसबा गणपती...' मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे अलका चौकात आगमन
पुणे: पहिला गणपती कसबा गणपती अन् गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात अलका चौकात मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे आगमन झाले. ढोल पथकांच्या वादनाबरोबरच पुणेकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रुद्रगर्जनेच्या आकर्षक तालांनी नागरिकांची मने जिंकली.
टाळ्यांच्या गजरात अन् गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात कसबा गणपतीचे स्वागत करण्यात आले. मोरया-मोरयाच्या आवाजाने अलका चौक दुमूदुमून गेला होता.
पुणे: ध्वजपथक कसबा गणपती अलका चौकात (टिळक चौक)
— Lokmat (@lokmat) September 9, 2022
दुपारी २.४० ला दाखल#pune#AnantChaturdashi2022pic.twitter.com/Qg5hj46VOq
कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोरया मोरया चा जल्लोष केला.