Pune Airport: दसऱ्याला पुणे विमानतळावरून सर्वाधिक विमानाची उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 14:51 IST2021-10-16T14:49:09+5:302021-10-16T14:51:49+5:30
१६ ऑक्टोबरपासून पुणे विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी १४ दिवसासाठी बंद होणार असल्याने मागच्या आठवड्या पासून पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली होती (shut down pune airport)

Pune Airport: दसऱ्याला पुणे विमानतळावरून सर्वाधिक विमानाची उड्डाणे
पुणे: दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरून तब्बल ६३ विमानांची उड्डाणे झाली. यात ९८०३ प्रवासी पुण्याहून दुसऱ्या शहरांत गेले तर ८५२४ प्रवासी पुण्यात दाखल झाले. प्रवासी संख्या देखील विक्रमी आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेनंतर सुरू झालेल्या विमानसेवेतला हा आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. शनिवारपासून पुणे विमानतळ बंद होणार असल्याने प्रवासी वाहतूक वाढली.
१६ ऑक्टोबरपासून पुणे विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी १४ दिवसासाठी बंद होणार असल्याने मागच्या आठवड्या पासून पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली होती. पुण्यात येणाऱ्यापेक्षा पुण्यातून जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. सामन्यतः पुणे विमानतळांवर रोज १० ते ११ हजार प्रवाशांची वाहतूक होते. अलीकडच्या काळात ती हळूहळू वाढत गेली. मागच्या आठवड्यात ही संख्या १५ ते १६ हजारांवर पोहोचली. शुक्रवारी मात्र प्रवासी संख्येने उचचांक गाठला. शुक्रवारची संख्या १८ हजारहून अधिक होती.
३० ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता विमानतळ खुले-
१६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पुणे विमनातळ धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. ३० ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजता विमानतळ वाहतुकीसाठी पुन्हा खुले होणार आहे. त्याच दिवसापासून पुणे विमानतळाचा विंटर शेड्युल सुरु होणार असल्याने पुणे विमानतळावरून उड्डाणांची संख्या वाढणार आहे.