सभा नक्की घ्या! मात्र वैयक्तिक टीका, धार्मिक मुद्दे न घेता विकासावर बोला, पुणेकरांचे बॅनरद्वारे नेत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:47 IST2026-01-09T19:44:45+5:302026-01-09T19:47:00+5:30

वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणी, शिक्षणाची गुणवत्ता, रोजगारनिर्मिती, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि नियोजनबद्ध शहरविकास हे पुणेकरांचे रोजचे प्रश्न आहेत

Definitely hold a meeting! But talk about development without taking up personal religious issues, Punekars appeal to leaders through banners | सभा नक्की घ्या! मात्र वैयक्तिक टीका, धार्मिक मुद्दे न घेता विकासावर बोला, पुणेकरांचे बॅनरद्वारे नेत्यांना आवाहन

सभा नक्की घ्या! मात्र वैयक्तिक टीका, धार्मिक मुद्दे न घेता विकासावर बोला, पुणेकरांचे बॅनरद्वारे नेत्यांना आवाहन

बिबवेवाडी: परिसरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी झळकलेल्या आशयपूर्ण बॅनरमुळे सध्या पुणेकरांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. या बॅनरमधून नेते आणि राजकीय पक्षांना थेट सवाल करण्यात आला असून सभा, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांऐवजी पुण्याच्या खऱ्या आणि ज्वलंत प्रश्नांवर बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक मुद्दे, जातीय द्वेष, बंडखोरी, गद्दारी, तसेच वैयक्तिक टीका यांपासून दूर राहून शहराच्या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करा, असा स्पष्ट संदेश या फलकांवरून दिला जात आहे.

वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिक्षणाची गुणवत्ता, रोजगारनिर्मिती, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि नियोजनबद्ध शहरविकास हे पुणेकरांचे रोजचे प्रश्न आहेत. मात्र राजकीय चर्चांमध्ये हे मुद्दे नेहमीच बाजूला पडतात, अशी नागरिकांची भावना आहे. त्याच भावनेला या बॅनरमधून आवाज मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची धामधूम सुरू असताना हे बॅनर अधिक लक्ष वेधून घेत आहेत. अनेक नागरिक थांबून ते वाचत असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा प्रत्येक पुणेकराचा सवाल आहे, आम्हाला भांडणं नकोत, उपाय हवेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

Web Title : पुणेकरों ने नेताओं से की अपील: विकास पर ध्यान दें, व्यक्तिगत हमले छोड़ें।

Web Summary : पुणे के नागरिक नेताओं से शहर के मुद्दों, जैसे यातायात, पानी और बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित करने की मांग कर रहे हैं, व्यक्तिगत हमलों या विभाजनकारी बयानबाजी से बचने का आग्रह कर रहे हैं। बैनर समाधानों की आवश्यकता पर प्रकाश डालते हैं।

Web Title : Pune Citizens Urge Leaders: Focus on Development, Skip Personal Attacks.

Web Summary : Pune citizens are demanding leaders address city issues like traffic, water, and infrastructure instead of engaging in personal attacks or divisive rhetoric. Banners highlight the need for solutions over arguments.