भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 06:47 IST2026-01-11T06:46:31+5:302026-01-11T06:47:20+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारावर केलेल्या टीकेला थेट उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी टाळले

भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
पिंपरी (पुणे): भाजपचे काम बोलत आहे, म्हणूनच विरोधक वैतागले आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काम नाही, म्हणून वादावादी सुरू आहे. कोणाच्याही टीकेला उत्तर देण्याची गरज नाही; तुम्ही केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारावर केलेल्या टीकेला थेट उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.
आकुर्डीत शनिवारी भाजपची म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विजयी संकल्प सभा झाली. फडणवीस पूर्वर्वीपेक्षा जास्त जागा निवडून आणेल. 'जेएनएनयूआरएम' अंतर्गत १५ वर्षे घरांची कामे रखडली. ती निकृष्ट दर्जाची बनविण्यात आली. मोदी सरकारच्या काळात बोन्हाडेवाडी, डुडुळगाव व चऱ्होली येथे पंतप्रधान आवास योजनेतून दर्जेदार घरे दिली. पिंपरी-चिंचवडमधील विविध समस्या भाजपच्या काळातच सोडविण्यात आल्या. महापालिका शाळांचा दर्जा सुधारला असून या शाळांमधील प्रवेश दरवर्षी वाढत आहेत.
ठाकरे सरकारच्या काळात पाणीपुरवठा योजनेचे वाटोळे
भाजप सरकारने शहराला बंद पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचे काम सुरू केले होते; पण या योजनेचे ठाकरे सरकारच्या काळात वाटोळे झाले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर सभेत केली. या योजनेचे काम आम्ही पूर्ण केले. आता दुसऱ्या टप्प्यात शहरातील जलवितरण सुधारणेसाठी ८५० कोटी रुपयांची योजना मंजूर केली असून निविदा काढली आहे, असे म्हणाले.
शहराचे प्रश्न मार्गी लावले
सोलापुरातील शास्तीकराचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता; मात्र एका झटक्यात ३०० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ केला. प्राधिकरणातील बाधितांचा १२.५ टक्के परतावा व प्रॉपर्टी फ्री होल्डचा प्रश्न मार्गी लावला. यामुळे महापालिकेच्या करात सुमारे ३५० कोटींची भर पडली. शहराची 'सेफ सिटी'कडे वाटचाल सुरू असून रेडझोन, निळ्या-लाल पूररेषेचा प्रश्नही मार्गी लावू, असेही फडणवीस म्हणाले.
मुंडेंना सोबत घेऊन हेलिकॉप्टरने प्रवास
संत वामनभाऊ यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने शनिवारी गहिनीनाथगड (ता. पाटोदा) येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडावरील कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सोलापूरच्या सभेसाठी जाताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेऊन प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.