Pune Crime| पत्नीला जातिवाचक शिवीगाळ, पतीविरोधात ॲट्रॉसिटी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 11:45 IST2022-07-28T11:41:15+5:302022-07-28T11:45:01+5:30

जातीवरून मानसिक त्रास...

Caste abuse to wife atrocity against husband woman had a love marriage with the accused | Pune Crime| पत्नीला जातिवाचक शिवीगाळ, पतीविरोधात ॲट्रॉसिटी दाखल

Pune Crime| पत्नीला जातिवाचक शिवीगाळ, पतीविरोधात ॲट्रॉसिटी दाखल

पिंपरी : तू खालच्या जातीतील आहे. तुझ्यामुळे सगे-सोयरे मला बोलतात, असे बोलून पत्नीला मानसिक त्रास देत मारहाण करणाऱ्या पती आणि त्याला साथ देणाऱ्या दीर, सासरे आणि एका महिलेविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार चऱ्होली बु. (ता. मावळ) तसेच कळंब (उस्मानाबाद) येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा आरोपीसोबत प्रेमविवाह झाला.

मात्र, लग्नाच्या काही कालावधीनंतर पतीने फिर्यादी महिलेला तिच्या जातीवरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्याची धमकी दिली. फिर्यादी पतीसोबत उस्मानाबाद येथे गेली असता, तेथे देखील तिच्या दीर, सासऱ्याने जातिवाचक बोलून त्रास दिला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Caste abuse to wife atrocity against husband woman had a love marriage with the accused