पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच दादा; अजित पवार यांचा फेल गेला वादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 11:36 IST2026-01-17T11:35:18+5:302026-01-17T11:36:19+5:30

पिंपरी : भाजपच्या सत्ताकाळातील कथित भ्रष्टाचारावर केलेला घणाघात आणि मेट्रो-बससेवा मोफत देण्याचा अजित पवार यांचा दावा 'फेल' गेला. पिंपरी-चिंचवडच्या ...

BJP is the dominant force in Pimpri-Chinchwad Ajit Pawar challenge failed | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच दादा; अजित पवार यांचा फेल गेला वादा

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच दादा; अजित पवार यांचा फेल गेला वादा

पिंपरी : भाजपच्या सत्ताकाळातील कथित भ्रष्टाचारावर केलेला घणाघात आणि मेट्रो-बससेवा मोफत देण्याचा अजित पवार यांचा दावा 'फेल' गेला. पिंपरी-चिंचवडच्या मतदारांनी भाजपला पुन्हा कौल दिला. पवार यांना राज्यात सर्वाधिक अपेक्षा याच शहरात असल्याने ते आक्रमकपणे उतरले, मात्र तो जोर होता केवळ अखेरच्या टप्प्यातच. तत्पूर्वी भाजपने त्यांचे आणि इतर पक्षांतील ताकदवान मोहरे पळवले होते. त्यांना सत्तेतील वाट्याचा आणि मुबलक निधी मिळवण्याचा शब्द दिला होता. मेट्रोचा विस्तार, स्मार्ट सिटी, नद्या सुधारसारखे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा सत्ता द्या, हे भाजपचे आवाहन कामी आले. सत्तेत जायचे असेल तर भाजपला पर्याय नाही, असे चित्र तयार झाले. निवडणूक आपल्याभोवतीच फिरत राहील, याची काळजी भाजप आणि राष्ट्रवादीने घेतली. त्यामुळे इतर पक्ष बाजूला पडले. मुख्य सामना दोघांतच झाला. सर्वशक्तिनिशी लढलेल्या पण चतुराईने सावध पावले टाकलेल्या भाजपने तो एकहाती जिंकला.

भाजपची 'व्यवस्था' कामी आली : महायुतीकडेच सत्ता राहील, विरोधी पक्षही आपण ठरवू तोच असेल, ही भाजपची रणनीती यशस्वी ठरली. अजित पवार यांना शरद पवारांचा गट सोबत घेण्यास भाग पाडून महाविकास आघाडीच्या चिरफाळ्या उडवण्याची आणि ती पुन्हा उभी राहू शकणार नाही, अशी व्यवस्थाही भाजपने केली.

Web Title : पिंपरी-चिंचवड में भाजपा का दबदबा; अजित पवार की रणनीति विफल

Web Summary : भाजपा ने पिंपरी-चिंचवड को बरकरार रखा, अजित पवार के प्रयासों को हराया। मतदाताओं ने भाजपा के विकास वादों और स्थापित नेटवर्क का समर्थन किया। पवार की देर से आई तेजी भाजपा की रणनीतिक चालों को दूर नहीं कर सकी।

Web Title : BJP Dominates Pimpri-Chinchwad; Ajit Pawar's Strategy Fails

Web Summary : BJP retained Pimpri-Chinchwad, defeating Ajit Pawar's efforts. Voters favored BJP's development promises and established network. Pawar's late surge couldn't overcome BJP's strategic moves and promises of funding, solidifying their dominance.