शारदा - गणपती! अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची थाटात मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 14:41 IST2022-08-31T14:39:18+5:302022-08-31T14:41:21+5:30
मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.

शारदा - गणपती! अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची थाटात मिरवणूक
पुणे : आपला गणपती शारदा गणपती...गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष...ढोल ताशांचा निनाद... मंडईकरांचा ओंसडून वाहणारा उत्साह...अशा चैतन्यमयी वातावरणात आराध्य दैवत गणरायाचे स्वागत करण्यात आले. फुलांनी सजलेल्या मंगल कलश रथात अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची पांरपरिक थाटात आणि वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरोहित्य केले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात मिलिंद काची, संजय मते, देविदास बहिरट, विश्वास भोर, मधुकर सणस, सुरज थोरात, संकेत मते, विकी खन्ना, सोमनाथ कुल्हट, प्रवीण उरसळ, बाळासाहेब आमराळे, हर्षल भोर, माऊली टाकळकर, अप्पा तापकीर, अण्णा जगताप, डाॅ. सतीश देसाई यावेळी उपस्थित होते.
महात्मा फुले मंडई येथील शारदा गजानन मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ झाला, मंडई पोलीस चौकी – रामेश्वर चौकापर्यंत जाऊन पुन्हा मंडई पोलीस चौकी मार्गे उत्सव मंडपात संपन्न झाली.