राहुल गांधींच्या दूरध्वनीने सात वर्षांचा नंदन हरखला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:48 AM2019-04-20T03:48:32+5:302019-04-20T03:48:59+5:30

वायनाडमधूनही निवडणूक लढविणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कन्नूरला आले असता त्यांची भेट न झाल्याने नंदन हा सात वर्षांचा मुलगा हिरमुसला होता.

Rahul Gandhi's phone calls to the seven-year-old Nandan Harakhla | राहुल गांधींच्या दूरध्वनीने सात वर्षांचा नंदन हरखला

राहुल गांधींच्या दूरध्वनीने सात वर्षांचा नंदन हरखला

Next

नवी दिल्ली : वायनाडमधूनही निवडणूक लढविणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कन्नूरला आले असता त्यांची भेट न झाल्याने नंदन हा सात वर्षांचा मुलगा हिरमुसला होता. त्याचा उल्लेख त्याच्या वडिलांनी फेसबुकवर करताच, राहुल गांधी यांनी नंदनला दूरध्वनी करून त्याच्याशी गप्पा मारल्या.
कन्नूर येथे सुरक्षेच्या कारणास्तव नंदन याला राहुल गांधी यांची भेट घेता आली नाही. पण आता राहुल गांधी यांनीच नंदनला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले असल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
भेटण्याचे दिले आश्वासन
पुन्हा कन्नूरला आल्यानंतर मी तुला भेटेन, घेईन, असे राहुल गांधी यांनी नंदनला सांगितले आहे. या घटनेचे ‘राहुल गांधी यांची गोड कामगिरी’ असे वर्णन काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी केले आहे.

Web Title: Rahul Gandhi's phone calls to the seven-year-old Nandan Harakhla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.