दुर्दैवी! बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:19 IST2022-01-24T12:14:57+5:302022-01-24T12:19:01+5:30

अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

young man on two wheeler died accident moshi toll plaza bhosari | दुर्दैवी! बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

दुर्दैवी! बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

पिंपरी : बहिणीच्या गावी जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. मोशी येथील टोल नाक्याजवळ शुक्रवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

सचिन पुंडलिक बुरुड (वय २१, रा. शेरेवाडी, आव्हाट, ता. खेड, जि. पुणे), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप रामभाऊ बुरुड (वय ३५, रा. कोंडवे- धावडे, खडकवासला) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २३) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ सचिन बुरुड हा शुक्रवारी (दि. २१) त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी शेरेवाडी येथून चऱ्होली येथे जात होता. त्यावेळी मोशी येथील टोल नाक्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सचिन बुरुड याचा मृत्यू झाला. 

आरोपी अज्ञात वाहन चालक हा अपघातानंतर घटनास्थळी न थांबता तसेच जखमी सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता पळून गेला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली नाही. पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव तपास करीत आहेत.

Web Title: young man on two wheeler died accident moshi toll plaza bhosari