महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:49 IST2025-12-23T15:48:02+5:302025-12-23T15:49:13+5:30

महाविकास आघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहे. महायुतीत उमेदवारी न मिळालेल्यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation in a state of war; Political temperature rises due to alliance-coalition calculations | महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले

महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटात उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. तर महाविकास आघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहे. महायुतीत उमेदवारी न मिळालेल्यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

महायुतीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित असले, तरी अद्याप जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. कोणत्या पक्षाला किती जागा, कोणते प्रभाग कोणाच्या वाट्याला, यावरून अंतर्गत चर्चा आणि दबावतंत्र सुरू आहे. युतीतील हा विलंब भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर भाजपच्या जागांवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच महाविकास आघाडी आणि अजित पवार गट यांची युती होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनसेने महाविकास आघडीबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून ‘एकला चलो’पासून ते आक्रमक इनकमिंगपर्यंत सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट, आरपीयआय यांच्यातील जागावाटप सूत्र ठरलेले नाही.

उमेदवारीच्या तोंडावर कॉँग्रेसमध्ये खळबळ

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिलेला राजीनामा शहरातील राजकारणात खळबळ उडवणारा ठरला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि नेतृत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, भाजपने इतर सर्वच पक्षांतील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्षांसह अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून आपली ताकद वाढवली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही भाजप, शरद पवार गटासह उद्धव ठाकरे गटातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत आपली बाजू मजबूत केली आहे. एकूणच, युती-अघाड्यांची गणिते, पक्षांतरे आणि नेतृत्वबदल यामुळे पिंपरी-चिंचवडची महापालिका निवडणूक चुरशीची होईल की एकतर्फी होईल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चुनाव: गठबंधन से सियासी पारा चढ़ा

Web Summary : पिंपरी-चिंचवड में महानगरपालिका चुनावों से पहले राजनीतिक माहौल गरमाया। भाजपा और राकांपा (अजित पवार गुट) उम्मीदवारों के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जबकि महा विकास अघाड़ी सहयोग तलाश रही है। आंतरिक विवादों से चुनाव की प्रतिस्पर्धा बढ़ गई है।

Web Title : Pimpri-Chinchwad Municipal Elections Heat Up Amid Alliance Maneuvering

Web Summary : Pimpri-Chinchwad's political scene is charged as alliances shift before municipal elections. The BJP and NCP (Ajit Pawar faction) are vying for candidates, while Maha Vikas Aghadi explores collaborations. Internal disputes and party hopping heighten the election's competitiveness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.