Municipal Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धवसेनेचे ५९ तर ‘मनसे’चे १७ जागांवर उमेदवार लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:21 IST2025-12-31T13:20:03+5:302025-12-31T13:21:41+5:30
महापालिकेच्या ३२ प्रभागांमधील १२८ पैकी ५९ जागांवर उद्धवसेनेतर्फे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत. यात तीन उमेदवार मुस्लीम आहेत.

Municipal Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धवसेनेचे ५९ तर ‘मनसे’चे १७ जागांवर उमेदवार लढणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती झाली आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांमधील १२८ पैकी ५९ जागांवर उद्धवसेनेतर्फे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत. यात तीन उमेदवार मुस्लीम आहेत.
प्रभाग १ अ - विजय जरे, ड – राहुलकुमार भोसले, प्रभाग २ ब – कल्पना घंटे, क - मोहम्मद आरिफ खान, प्रभाग ३ अ - रेखा ओव्हाळ, क – मनीषा बोराटे, प्रभाग ५ ब - योगेश ठाकरे, क - कल्पना शेटे, ड – दिलीप सावंत, प्रभाग ५ ड – संदीप पाळंदे, प्रभाग ८ अ - दत्ता शेटे, क - सरिता कुऱ्हाडे, प्रभाग ९ अ - सागर सूर्यवंशी, ब - समरीन कुरेशी, ड – गणेश जाधव, प्रभाग १० अ - रूपाली गायकवाड, प्रभाग ११ अ - विश्वास गजरमल, ब - मंगला सोनावणे, क – मोहर कोकाटे, ड – काशीनाथ जगताप, प्रभाग १२ अ – अमोल भालेकर, प्रभाग १३ अ - रवींद्र खिलारे, ब - संगीता पवार, ड – सतीश मरळ, प्रभाग १४ अ- निखिल दळवी, क - योगिता कांबळे,
प्रभाग १६ क – भाग्यश्री तरस, प्रभाग १७ ब – रवींद्र महाजन, क – ज्योती भालके, ड – किरण दळवी, प्रभाग १८ ब – रफिया पानसरे, क – राहुल पालांडे, ड – सचिन दोनगहू, प्रभाग १९ अ - पूजा साबळे, ब - ताहीर भालदार, ड – आकाश चतुर्वेदी, प्रभाग २० अ – गौतम लहाने, ब – नीलम म्हात्रे, क – संजना संजय यादव, प्रभाग २१ क - पूजा इंगळे, प्रभाग २२ ब – सुजाता नखाते, ड – गौरव नढे, प्रभाग २३ अ - सविता जाधव, ड – कानिफनाथ केदारी, प्रभाग २५ अ - सागर ओव्हाळ, ब - बेबी जाधव, ड – चेतन पवार, प्रभाग २६ क - मीरा कदम, ड - प्रकाश बालवडकर, प्रभाग २७ क – वनिता नखाते, प्रभाग २८ क – अनिता तुतारे, प्रभाग २९ अ - अनसूया सकट, प्रभाग ३० अ - गोपाळ मोरे, ब - पार्वती खामकर, क – सुषमा गावडे ड – तुषार नवले, प्रभाग ३२ अ - ज्योती गायकवाड, ब – रेश्मा शिंदे, क – वर्षा पोंगडे यांना उद्धवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
‘मनसे’चे १७ उमेदवार निवडणूक रिंगणात
पिंपरी - चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धवसेना यांची युती झाली आहे. यात मनसे १७ जागांसाठी निवडणूक लढवत आहे.
मनसेतर्फे प्रभाग २ ड - जयसिंग भाट, प्रभाग ६ ब - नीलेश सूर्यवंशी, प्रभाग ८ ड - प्रतीक जिते, प्रभाग १० ब - गीता चव्हाण, क - कैलास दुर्गे, ड - हर्षकुमार महाडिक, प्रभाग १३ अ - शशिकिरण गवळी, क - अश्विनी चिखले, ड - सचिन चिखले, प्रभाग १४ ब - आदिती चावरिया, प्रभाग १५ क - स्वाती दानवले, प्रभाग १६ ब - अस्मिता माळी, प्रभाग १९ अ - लता शिंदे, प्रभाग २१ ड - राजू भालेराव, प्रभाग २७ अ - तुकाराम शिंदे, प्रभाग ३० क - रेखा जम, प्रभाग ३२ ड - राजू सावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.