PCMC Election Results 2026 : आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:56 IST2026-01-16T08:56:21+5:302026-01-16T08:56:21+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरातील आठ ठिकाणी मतमोजणी : दुपारी दोनपर्यंत होणार चित्र स्पष्ट; उत्सुकता शिगेला

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The city manager will be elected today..! The gulal will be thrown in the afternoon | PCMC Election Results 2026 : आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी

PCMC Election Results 2026 : आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील आठ ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेस आज, शुक्रवारी (दि. १६) सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असतील. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचा निकाल ध्वनिक्षेपकावर जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी दुपारी दोनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ठरवलेल्या ठिकाणी मतमोजणी होईल. प्रत्येक ठिकाणी चार प्रभागांची अशी एकूण ३२ प्रभागांची मोजणी करण्यात येईल. मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. 

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहायक कर्मचाऱ्यांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आले आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच, प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

मतमोजणीच्या १० ते २१ फेऱ्या होणार

एका प्रभागात किमान ३९ ते कमाल ९७ मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार मतमोजणीसाठी ३ ते ७ टेबलची व्यवस्था केली आहे. त्यानुसार किमान १० ते कमाल २१ इतक्या फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. टपाली मतदारासाठी स्वतंत्र टेबल ठेवले आहेत.

या ठिकाणी होणार मतमोजणी

क्षेत्रीय कार्यालय - प्रभाग क्रमांक- मतमोजणी ठिकाण

अ - १०, १४, १५, १९ - डॉ. हेडगेवार भवन, निगडी, प्राधिकरण

ब - १६, १७, १८, २२ - ऑटो क्लस्टर, चिंचवड

क - २, ६, ८, ९ - संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर

ड - २५, २६, २८, २९ - ड क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी

ई - ३, ४, ५, ७ - कबड्डी प्रशिक्षण संकुल, भोसरी

फ - १,११, १२, १३ - घरकुल येथील चिखली टाऊन हॉल

ग - २१, २३, २४, २७ - शंकर गावडे कामगार भवन, थेरगाव

ह - २०, ३०, ३१, ३२ - कासारवाडी, भाजी मंडई

Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The city manager will be elected today..! The gulal will be thrown in the afternoon