चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 4, 2026 16:08 IST2026-02-04T16:06:47+5:302026-02-04T16:08:51+5:30

- अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत; दोन विधानसभेचे आमदार नावालाच, कारभार भोसरी आणि चिंचवडच्या हाती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Pimpri ranks second in post allocation? The scale leans towards Chinchwad-Bhosari | चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच

चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून पदवाटप करताना पिंपरी विधानसभा मतदारसंघाला अपेक्षित स्थान दिले जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील महत्त्वाची पदे चिंचवड व भोसरी मतदारसंघांना मिळाल्याने पिंपरीचा राजकीय प्रभाव कमी पडतो आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापौरपद भोसरी विधानसभा मतदारसंघाला दिले असून, सत्तारूढ पक्षनेतेपद चिंचवड मतदारसंघाकडे गेले आहे. अशातच उपमहापौरपदासाठी भाजपच्या शीतल शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते, मात्र त्यांनी अचानक नकार दिला. त्यानंतर नगरसेविका शर्मिला बाबर यांना अर्ज भरण्यास सांगितले गेले, या घाईत घेतलेल्या निर्णयामुळे पक्षातील समन्वयाचा अभाव आणि नाराजी दिसून आली आहे. याशिवाय, महापालिकेच्या आर्थिक व धोरणात्मक स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही चिंचवड किंवा भोसरी मतदारसंघातील नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी पुन्हा महत्त्वाच्या पदवाटपातून बाजूला राहत असल्याचे चित्र दिसत आहेत.

भाजपचे दोन आमदार असूनही...

पिंपरी मतदारसंघातले विधान परिषदेवर भाजपचे दोन आमदार असूनही त्याचा निर्णयप्रक्रियेत परिणाम स्पष्ट दिसत नाही. पिंपरीत भाजपचे चांगले नगरसेवक निवडून आले आहेत. तरीही सत्तेतील प्रतिनिधित्वात तो प्रभाव पडत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षासाठी आव्हान ठरू शकते, त्यामुळे भाजपने संतुलित पदवाटप करण्याची मागणी जोर धरत आहे.

तीनही प्रमुख पदासाठी पिंपरीला ठेंगा...

आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही चिंचवड किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकालाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तसे झाले, तर महापालिकेच्या तीनही प्रमुख केंद्रबिंदूंमध्ये पिंपरी पुन्हा एकदा बाजूला पडल्याचे चित्र स्पष्ट होईल. 

रिपब्लिकन पक्षालाही डावलले...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुतीत सहभागी असूनही रिपब्लिकन पक्षाला डावलले जात असल्याची भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे शहराध्यक्ष व नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी व्यक्त केली आहे. महापौर व उपमहापौरपद न मिळाल्यानंतर आता स्थायी समिती सभापतिपद देऊन अन्याय दूर करावा, अशी त्यांनी मागणी केली. पुणे महापालिकेत भाजपने रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद देऊन युतीचा धर्म पाळला होता. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्ते व आंबेडकरी समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title : पीसीएमसी शक्ति-साझेदारी में पिंपरी हाशिये पर; चिंचवड, भोसरी को प्राथमिकता।

Web Summary : पीसीएमसी शक्ति वितरण में पिंपरी को नजरअंदाज किया गया, प्रमुख पद चिंचवड और भोसरी को मिले। इससे स्थानीय भाजपा कार्यकर्ताओं और सहयोगियों में असंतोष है, जो आगामी चुनावों को प्रभावित कर सकता है।

Web Title : Pimpri sidelined in PCMC power-sharing; Chinchwad, Bhosari get priority.

Web Summary : Pimpri feels ignored in PCMC power distribution, with key posts going to Chinchwad and Bhosari. This sparks discontent among local BJP workers and allies, potentially impacting upcoming elections.