Municipal Election 2026: दिवसभरात ५२५ अर्ज दाखल; आतापर्यंत ५७४ जण मैदानात;उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:06 IST2025-12-30T13:51:21+5:302025-12-30T14:06:11+5:30
PCMC Election 2026: अनेकांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने अंतिम यादी जाहीर होईपर्यंत राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे

Municipal Election 2026: दिवसभरात ५२५ अर्ज दाखल; आतापर्यंत ५७४ जण मैदानात;उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी (दि.२९) एकूण ५२५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे सोमवारपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ५७४ वर पोहोचली आहे. काही उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षांचे, तसेच अपक्ष असे एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याचेही चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेकांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने अंतिम यादी जाहीर होईपर्यंत राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत निवडणूक वातावरण अधिकच तापणार आहे.
ब क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक अर्ज
सोमवारी (दि.२९) ब क्षेत्रीय कार्यालयात १०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर ह क्षेत्रीय कार्यालयात ७५ तर सर्वात कमी फ क्षेत्रीय कार्यालयार्गत २८ अर्ज दाखल झाले आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय सोमवारी (दि.२९) आलेले अर्ज
अ - ६३
ब - १०६
क - ५०
ड - ६३
इ - ४२
फ - २८
ग - ५४
ह - ७५