PCMC Election Results 2026 :निवडणूक निकालांची सुरुवात; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:28 IST2026-01-16T10:26:04+5:302026-01-16T10:28:52+5:30

पोस्टल  मतमोजनीच्या पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर आहे

PCMC Election Results 2026 Pimpri-Chinchwad BJP leading in 8 seats | PCMC Election Results 2026 :निवडणूक निकालांची सुरुवात; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर

PCMC Election Results 2026 :निवडणूक निकालांची सुरुवात; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर

पिंपरी:  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी (दि.१६) टपाल मतांच्या मोजणीने सुरुवात झाली. प्रारंभीच्या टपाल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली असून, इतर पक्षांना मर्यादित यश मिळाले आहे. एकूण १२८ जागांसाठी ही निवडणूक होत असून, टपाल मतांमधून राजकीय पक्षांची प्राथमिक ताकद स्पष्ट होऊ लागली आहे.

 टपाल मतमोजणी व पहिल्या फेरीनुसार भाजपने ८ जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीने (अजित पवार) ६, तर राष्ट्रवादी (शरद पवार) २ जागांवर आघाडीवर आहे. शिंदेसेनेने १ जागेवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस, उद्धवसेना, मनसे तसेच वंचित बहुजन आघाडी, सप, एमआयएम, आप, बसप आदी इतर पक्षांना टपाल मतांमध्ये अद्याप खाते उघडता आलेले नाही.
 

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 13

शिंदेसेना - 02

राष्ट्रवादी (अप) - 10

काँग्रेस - 0

उद्धवसेना - 0

राष्ट्रवादी (शप) - 02

मनसे - 01

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 0



दरम्यान, मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असतील. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचा निकाल ध्वनिक्षेपकावर जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी दुपारी दोनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ठरवलेल्या ठिकाणी मतमोजणी होईल. प्रत्येक ठिकाणी चार प्रभागांची अशी एकूण ३२ प्रभागांची मोजणी करण्यात येईल. मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. 

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहायक कर्मचाऱ्यांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आले आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच, प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. 

मतमोजणीच्या १० ते २१ फेऱ्या होणार

एका प्रभागात किमान ३९ ते कमाल ९७ मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार मतमोजणीसाठी ३ ते ७ टेबलची व्यवस्था केली आहे. त्यानुसार किमान १० ते कमाल २१ इतक्या फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. टपाली मतदारासाठी स्वतंत्र टेबल ठेवले आहेत.

या ठिकाणी होणार मतमोजणी

क्षेत्रीय कार्यालय - प्रभाग क्रमांक- मतमोजणी ठिकाण

अ - १०, १४, १५, १९ - डॉ. हेडगेवार भवन, निगडी, प्राधिकरण

ब - १६, १७, १८, २२ - ऑटो क्लस्टर, चिंचवड

क - २, ६, ८, ९ - संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर

ड - २५, २६, २८, २९ - ड क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी

ई - ३, ४, ५, ७ - कबड्डी प्रशिक्षण संकुल, भोसरी

फ - १,११, १२, १३ - घरकुल येथील चिखली टाऊन हॉल

ग - २१, २३, २४, २७ - शंकर गावडे कामगार भवन, थेरगाव

ह - २०, ३०, ३१, ३२ - कासारवाडी, भाजी मंडई
 

Web Title : PCMC चुनाव 2026: मतगणना शुरू; पिंपरी-चिंचवड में भाजपा आगे

Web Summary : पिंपरी-चिंचवड चुनाव की मतगणना आज आठ स्थानों पर शुरू हुई। डाक मतों की गिनती में भाजपा आगे है। ईवीएम और डाक मतों के लिए अलग-अलग टेबल की व्यवस्था की गई है। लाउडस्पीकर के माध्यम से परिणाम घोषित किए जा रहे हैं। दोपहर 2 बजे तक गिनती पूरी होने की उम्मीद है। भारी पुलिस सुरक्षा तैनात है।

Web Title : PCMC Election 2026: Counting Begins; BJP Leads in Pimpri-Chinchwad

Web Summary : Pimpri-Chinchwad election counting started today at eight locations. The BJP is leading in postal vote counting. Separate tables for EVM and postal votes are arranged. Results are announced via loudspeaker. Counting is expected to finish by 2 PM. Heavy police security is in place.