PCMC Election Results 2026 : भाजपची एकहाती सत्ता, कोणते मुद्दे ठरले निर्णायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:28 IST2026-01-16T19:27:53+5:302026-01-16T19:28:52+5:30

या निवडणुकीत ‘गाववाला विरुद्ध बाहेरचा’ हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी राहिला.

PCMC Election Results 2026: BJP's one-handed power, which issues were decisive? | PCMC Election Results 2026 : भाजपची एकहाती सत्ता, कोणते मुद्दे ठरले निर्णायक?

PCMC Election Results 2026 : भाजपची एकहाती सत्ता, कोणते मुद्दे ठरले निर्णायक?

पुणे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मुसंडी मारत शहरावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मतमोजणी अद्याप काही प्रभागांत सुरू असतानाच भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या निकालामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रचारातील कोणते मुद्दे ठरले निर्णायक?

या निवडणुकीत ‘गाववाला विरुद्ध बाहेरचा’ हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी राहिला. भाजपने आपल्या प्रचाराचा रोख थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे वळवला. दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र भाजपने आपल्या सत्ताकाळातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि केंद्र–राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीचा दाखला देत या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

भाजपचा प्रचार तुलनेने संयमी आणि शहरी मतदारांना उद्देशून होता. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचे श्रेय घेत शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपने दिले. याचा थेट फायदा पक्षाला झाला.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

या निवडणुकीत मतदारांनी सातत्याने काम करणाऱ्या आणि संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना पसंती दिली. दीर्घकाळ सत्तेत असूनही वादग्रस्त प्रतिमा असलेल्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तरी भाजपचे वर्चस्व कमी झाले नाही, उलट महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये फाटाफूट स्पष्टपणे दिसून आली.

शहरी मतदार, गृहनिर्माण सोसायट्यांमधील मतदार आणि स्थानिक पारंपरिक नेतृत्व यांचा कल पुन्हा भाजपकडे झुकलेला दिसला. “शहराचा वेगवान विकास हवा असेल तर एकहाती सत्ता द्या” हा भाजपचा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

निकालानंतर स्थानिक राजकारणात काय बदल?

भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) दुसऱ्या क्रमांकावर, तर शिंदेसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. काँग्रेस, उद्धवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष यांना अपेक्षित यश मिळाले नाही. सत्तेत सहभागी व्हायचे असेल तर भाजपसोबतच जायला लागेल, असा स्पष्ट संदेश या निकालातून गेला आहे.

राजकीय सूत्रांनुसार भाजप शिंदेसेना आणि काही अपक्षांना सोबत घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेतील राजकारणात महायुतीबाहेरील पक्षांना फारसा वाव उरणार नाही.

भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक यश मिळाले असून आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शहरातील सत्ता-सूत्रे सांभाळणाऱ्या लांडगेंचे पक्षातील महत्त्व पुन्हा वाढले आहे. स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव या निवडणुकीत ठळकपणे समोर आला असून पुढील राजकारणावरही त्याची छाप राहणार आहे.

Web Title : PCMC चुनाव 2026: भाजपा का दबदबा, जीत के मुख्य कारण?

Web Summary : भाजपा ने PCMC चुनावों में स्पष्ट बहुमत हासिल किया, विकास और कल्याणकारी योजनाओं पर जोर दिया। 'स्थानीय बनाम बाहरी' कथा और महा विकास अघाड़ी के भीतर कलह ने उनकी जीत में और योगदान दिया। शहरी मतदाताओं पर ध्यान केंद्रित करना और वादे निभाना निर्णायक साबित हुआ, विपक्षी पार्टियां पीछे रहीं।

Web Title : BJP Dominates PCMC Election 2026: Key Factors in Victory?

Web Summary : BJP secured a clear majority in the PCMC elections, emphasizing development and welfare schemes. The 'local vs. outsider' narrative and infighting within the Maha Vikas Aghadi further contributed to their win. Focus on urban voters and delivering on promises proved decisive, sidelining opposition parties.