PCMC Election Results 2026 : घरात घुसून तिघांनी धिंगाणा घातला? भाजप महिला उमेदवाराचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर आरोप; नेमकं काय घडलं?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:51 IST2026-01-17T15:50:33+5:302026-01-17T15:51:48+5:30

- पिंपरीतील संत तुकारामनगर पोलिस ठाण्यासमोर आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा ठिय्या

PCMC Election Results 2026 BJP woman candidate alleges that NCP workers entered her house. MLAs and office bearers sit in front of Sant Tukaramnagar police station in Pimpri. | PCMC Election Results 2026 : घरात घुसून तिघांनी धिंगाणा घातला? भाजप महिला उमेदवाराचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर आरोप; नेमकं काय घडलं?”

PCMC Election Results 2026 : घरात घुसून तिघांनी धिंगाणा घातला? भाजप महिला उमेदवाराचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर आरोप; नेमकं काय घडलं?”

पिंपरी : महापालिका प्रभाग २० मधील भाजपच्या उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरात घुसून तिघांनी धिंगाणा घातला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना करूनही पोलिस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करून पालांडे यांच्यासह आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पालांडे यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील एक व्यक्ती आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नातेवाइकांसह कार्यकर्ते पालांडे यांच्या घरात गेले. त्यावेळी घरात पालांडे यांच्या आई होत्या. संबंधितांनी बळजबरीने घरातील कपाटांची झडती घेतली व आईवर हात उगारला. याबाबत माहिती कळताच पालांडे यांनी घरी धाव घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पळून गेले. मात्र, भरारी पथकाच्या व्यक्तीला पकडून पालांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात नेले. याबाबत योगेश बहल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

पलांडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले. 

संक्रांतीचे वाण आणि दारूच्या बाटल्या

मी संक्रांतीनिमित्त महिलांना स्टीलचा डबा वाण म्हणून दिला, तसेच माझे पती व दोन मुलांसाठी घरात दारूच्या १६ बाटल्या ठेवल्या होत्या, असे सुजाता पालांडे यांनी सोशल मीडियावर ‘लाइव्ह’द्वारे सांगितले. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची गुंडगिरी किती दिवस सहन करायची? त्यांनीच हा प्रकार घडवून आणला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली नाही, तर मी आत्मदहन करेन.  - सुजाता पालांडे

Web Title : पीसीएमसी चुनाव: भाजपा उम्मीदवार ने एनसीपी कार्यकर्ताओं पर घर में घुसने का आरोप लगाया

Web Summary : भाजपा उम्मीदवार सुजाता पालांडे ने पीसीएमसी चुनाव के दौरान एनसीपी कार्यकर्ताओं पर घर में घुसने का आरोप लगाया। पुलिस ने एफआईआर दर्ज करने में देरी की। पालांडे और समर्थकों का विरोध। गिरफ्तारी न होने पर पालांडे ने आत्मदाह की धमकी दी।

Web Title : PCMC Election: BJP Candidate Accuses NCP Workers of Trespassing

Web Summary : BJP candidate Sujata Palande alleges NCP workers trespassed her house during PCMC election. Police delay filing FIR. Palande and supporters protest. Palande threatens self-immolation if arrests aren't made.