PCMC Election Results 2026 : ‘क्रॉस व्होटिंग’मुळे चिंचवडच्या गडावर भाजपला फटका, राष्ट्रवादीला एक जागा कायम

By विश्वास मोरे | Updated: January 21, 2026 15:49 IST2026-01-21T15:49:00+5:302026-01-21T15:49:43+5:30

भाजप, दोन राष्ट्रवादीमध्येच झाली प्रमुख लढत, अपर्णा डोके चौथ्यांदा, अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर यांना पुन्हा संधी

PCMC Election Results 2026 : BJP suffers blow in Chinchwad stronghold due to 'cross voting', NCP retains one seat | PCMC Election Results 2026 : ‘क्रॉस व्होटिंग’मुळे चिंचवडच्या गडावर भाजपला फटका, राष्ट्रवादीला एक जागा कायम

PCMC Election Results 2026 : ‘क्रॉस व्होटिंग’मुळे चिंचवडच्या गडावर भाजपला फटका, राष्ट्रवादीला एक जागा कायम

पिंपरी : चिंचवड प्रभाग क्रमांक १८ च्या आखाड्यातील दोन गटात भाजप, राष्ट्रवादी अशी दुरंगी, तर उर्वरित दोन गटात तिरंगी लढत झाली. क-ड गटामध्ये काटे की टक्कर झाली. त्यात भाजपच्या माजी महापौर अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, सुरेश भोईर आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनंत कोऱ्हाळे विजयी झाले. या प्रभागात क्रॉस व्होटिंग, गटबाजी, मतविभागणीचा फटका भाजपला बसला.

उमेदवारीच्या दिवशी राष्ट्रवादीच्या डोके यांनी भाजपमध्ये आणि कोऱ्हाळे राष्ट्रवादीत आले. विद्यमान नगरसेवक राजेंद्र गावडे यांना डावलल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. ‘अ’, ‘ब’ गटामध्ये दुरंगी, ‘क’ आणि ‘ड’ गटात तिरंगी लढत झाली. 

डोके चौथ्यांदा, कोऱ्हाळे, भोईर यांना पुन्हा संधी

‘अ’ गटातून अपर्णा डोके यांनी १९,०३३ यांनी पूजा आगज्ञान यांचा ९,५६३ मतांनी पराभव केला. आगज्ञान यांना ९,७४० मते मिळाली. डोके चौथ्यांदा नगरसेविका झाल्या. ‘ब’ गटात भाजपच्या मनीषा चिंचवडे १७,०७९ यांनी राष्ट्रवादीच्या ज्योती निंबाळकर यांचा ९,८२२ मतांनी पराभव केला. निंबाळकर यांना ७,२५७ मते मिळाली. उद्धवसेनेच्या रफिया इम्रान पानसरे यांनी २२५८ तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली, तर ‘क’ गटात भाजपचे ॲड. मोरेश्वर शेडगे, कोऱ्हाळे, राष्ट्रवादी (शप) गटाचे सागर चिंचवडे अशी तिरंगी लढत झाली. त्यात कोऱ्हाळे यांनी १४,५०४ मते घेऊन शेडगे २७०२ मतांनी पराभव केला. शेडगे यांनी ११,८०२ मते घेतली. तर ‘ड’ गटात भाजपचे सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, अपक्ष राजेंद्र गावडे अशी तिरंगी लढत झाली. त्यात भोईर यांनी ११,४७२ मते घेऊन गावडे यांचा १,२४४ मतांनी पराभव केला. अपक्ष असतानाही गावडे यांनी १०,२२८ मते घेतली. राष्ट्रवादीच्या चिंचवडे यांना ७,१२९ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 

क्रॉस व्होटिंगचा फटका

गतवेळी भाजपाला दोन, राष्ट्रवादीला एक, उद्धवसेनेला एक जागा मिळाल्या होत्या. अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे याचे तिकीट कापले तरीही गावडे यांनी अपक्ष लढून ताकद दाखवून दिली. भाजपने तीन जागांवर यश मिळविले असले तरी पॅनलप्रमुख शेडगे यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा, शहराध्यक्ष निवडीवेळी झालेली भाजप नेत्यांतील गटबाजी आणि क्रॉस व्होटिंगचा फटका त्यांना बसला.

Web Title : चिंचवड में क्रॉस-वोटिंग से भाजपा को झटका; राकांपा ने एक सीट बरकरार रखी।

Web Summary : चिंचवड के पीसीएमसी चुनाव में क्रॉस-वोटिंग से भाजपा को नुकसान हुआ। राकांपा ने एक सीट बरकरार रखी। भाजपा की पूर्व महापौर अपर्णा डोके जीतीं। आंतरिक कलह और निर्दलीय उम्मीदवारों ने भाजपा के प्रदर्शन को प्रभावित किया, हालांकि उसने तीन सीटें जीतीं।

Web Title : Cross-voting hits BJP in Chinchwad; NCP retains one seat.

Web Summary : Cross-voting impacted BJP in Chinchwad's PCMC election. NCP retained a seat. BJP's ex-mayor Aparna Doke won. Internal strife and independent candidates affected BJP's performance, despite winning three seats.