PCMC Election 2026: शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:21 IST2026-01-03T18:20:01+5:302026-01-03T18:21:04+5:30

- सामन्यांमध्ये रंगत : सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती समोरासमोर

PCMC Election 2026: Former corporators face to face in 17 wards of the city | PCMC Election 2026: शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात

PCMC Election 2026: शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात

पिंपरी : महापालिकेच्या १७ प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. त्यामुळे सामन्यांची रंगत वाढली आहे. तेथे काटाजोड लढती होणार आहेत. प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडेवाडी, जाधववाडीमधून माजी महापौर राहुल जाधव विरुद्ध माजी नगरसेवक वसंत बोराटे, प्रभाग पाच ‘ड’ गव्हाणे वस्तीमधून अनुराधा गोफणे विरुद्ध प्रियंका बारसे रिंगणात आहेत.

प्रभाग ९ मासूळकर कॉलनीमधून ‘ड’ गटातून माजी नगरसेवक सद्गुरू कदम विरुद्ध माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, तळवडे प्रभाग १२ मधून शांताराम भालेकर विरुद्ध पंकज भालेकर, प्रभाग १४ चिंचवड स्टेशन ‘ड’मधून मीनल यादव विरुद्ध वैशाली काळभोर, ‘ब’ गटातून प्रसाद शेट्टी विरुद्ध प्रमोद कुटे हे माजी नगरसेवक, प्रभाग १५ ‘ड’मधून माजी उपमहापौर शरद मिसाळ विरुद्ध धनंजय काळभोर, प्रभाग १८ ‘ब’ गटातून माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके विरुद्ध माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर रिंगणात आले आहेत. 


प्रभाग १८ चिंचवडगाव ‘क’ गटातून माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे विरुद्ध अनंत कोऱ्हाळे, ‘ड’ गटातून माजी नगरसेवक सुरेश भोईर विरुद्ध अश्विनी चिंचवडे, प्रभाग २० मध्ये माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर विरुद्ध माजी क्रीडा सभापती जितेंद्र ननावरे, प्रभाग २२ काळेवाडी ‘क’ गटातून माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे विरुद्ध माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, प्रभाग २५ ‘ड’मधून माजी गटनेते राहुल कलाटे विरुद्ध माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रभाग २६ ‘ड’मधून माजी नगरसेवक तुषार कामठे विरुद्ध संदीप कस्पटे, प्रभाग २९ मधून माजी नगरसेवक राजू लोखंडे विरुद्ध माजी नगरसेवक शशिकांत कदम, प्रभाग ३० दापोडी ‘अ’ गटातून माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे विरुद्ध राजू बनसोडे, ‘ड’ गटातून माजी नगरसेवक संजय काटे विरुद्ध रोहित काटे, प्रभाग ३२ मधून स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे विरुद्ध स्थायी समिती सभापती अतुल शितोळे रिंगणात आले आहेत.

तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात

महापालिकेच्या निवडणूक आखाड्यामध्ये सर्वच पक्षांनी नाते-गोते, गावकी-भावकीला प्राधान्य दिले आहे. यंदा तीन प्रभागांतून पती-पत्नी रिंगणात उतरले आहेत. निगडी गावठाण प्रभाग १३ मधील दोन गटामधून मनसेने शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळेमधील दोन गटातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते मोरेश्वर भोंडवे व त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर येथील दोन गटामधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल काटे लढत आहेत.

Web Title : शहर के वार्डों में पूर्व पार्षद आमने-सामने; तीन जगह पति-पत्नी प्रतिस्पर्धा में।

Web Summary : पिंपरी-चिंचवड चुनावों में 17 वार्डों में पूर्व पार्षद आपस में भिड़ रहे हैं, जिससे कड़ी प्रतिस्पर्धा है। तीन वार्डों में पति-पत्नी की जोड़ी चुनाव लड़ रही है। प्रमुख प्रतिद्वंद्वियों में पूर्व नेता एक-दूसरे का सामना कर रहे हैं, जिससे चुनाव का उत्साह और अप्रत्याशितता बढ़ गई है।

Web Title : Ex-Corporators Face Off in City Wards; Spouses Compete in Three.

Web Summary : Pimpri-Chinchwad elections see former corporators clashing in 17 wards, creating intense competition. Three wards feature husband-wife pairs contesting. Key rivalries include former leaders facing each other, adding to the election's excitement and unpredictability.