PCMC Election 2026 :निवडणुकीत ७१४९ मतदान यंत्रे आणि २९०० कंट्रोल युनिट; सर्व यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:20 IST2026-01-10T10:20:27+5:302026-01-10T10:20:47+5:30
महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात;शहरात २ हजार ६७ मतदान केंद्रे; आठ ठिकाणी होणार मतमोजणी

PCMC Election 2026 :निवडणुकीत ७१४९ मतदान यंत्रे आणि २९०० कंट्रोल युनिट; सर्व यंत्रणा सज्ज
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी पाच दिवसांचा कालावधी राहिला आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २ हजार ६७ मतदान केंद्रे आहेत, तर मतमोजणी शुक्रवारी (दि.१६) आठ ठिकाणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ३२ प्रभागांत १२८ जागा असून, ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ६ व १० मधून अनुक्रमे भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता १२६ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १० हजार ३३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात २ हजार ६७ मतदान केंद्रांमध्ये ७ हजार १४९ मतदान यंत्र (बॅलेट यूनिट), तर २ हजार ९०० कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असेल. केंद्रांकरिता साहित्याचे किट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या निवडणुकीसाठी ५२१ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात पीएमपीएमएल बसेसचा समावेश आहे.
-------
निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान
निवडणुकीत निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सोय केली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे.
------
मतदान यंत्रे सील करण्यास सुरुवात
महापालिका निवडणुकीसाठी काही मतदानयंत्रांमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर मतपत्रिका सील करण्यास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.
------
असे रोखणार दुबार मतदान
महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ९२ हजार दुबार मतदार आहेत. या मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार येथे मतदान करणार असेल, तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास तेथे मतदान केले, म्हणून शिक्का मारला जाणार आहे.
-------
मतमोजणी होणार आठ ठिकाणी
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ : स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण, सेक्टर क्र. २६
---------
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ : ऑटो क्लस्टर सभागृह येथील छोटा हॉल, चिंचवड,
---------
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ : संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी
------------
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ : ड क्षेत्रीय कार्यालय, औंध-रावेत बीआरटी रोड, रहाटणी
----------
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ : कबड्डी प्रशिक्षण संकुलाच्या तळमजल्यावर स्ट्राँग रूम व पहिल्या मजल्यावर मतमोजणी, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी
-----------
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ : घरकूल चिखली टाऊन हॉल, सेक्टर क्र. १७ व १९ दरम्यान, स्पाईन रोड शेजारी, चिखली
---------
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ : स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव
-----------
प्रभाग क्र. २०, ३०, ३१, ३२ : महापालिका कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल)
------------
एकूण मतदारसंख्या : १७, १३, ८९१
पुरुष : ९,०४,८१५
महिला : ८,०७, १३९
इतर : १९७
अनुसूचित जाती : २,७३,८१०
अनुसूचित जमाती : ३६,५३५