Maval Lok Sabha Result 2024: 'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही

By विश्वास मोरे | Published: June 4, 2024 09:26 AM2024-06-04T09:26:45+5:302024-06-04T09:29:20+5:30

पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरस असल्याचे दिसून येत आहे...

Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil Slow counting process | Maval Lok Sabha Result 2024: 'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही

Maval Lok Sabha Result 2024: 'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही

Maval Lok Sabha Result 2024| पिंपरी :मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज  क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळपासून सुरु झाली आहे आहे. कडेकोट बंदोबस्त आणि प्रशासकीय सज्जता दिसून येत आहे. मावळमधील मतमोजणीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरस असल्याचे दिसून येत आहे. मावळ मधून संजोर वाघेरे पाटील (Sanjog Waghere Pati) पुढे आहे.

बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच सज्जता करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आढावा घेतला. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. साडेआठला सुरुवातीला टपाली मतदान सुरू झाले.  विविध पक्षांच्या विविध राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मतमोजणी केंद्राच्या तीनही बाजूंना पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. 

मतमोजणीला विलंब, उत्कंठा वाढली!

पुणे बारामती शिरूर या लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या फेरीचे निकाल आले तरी मावळ मधील एक पहिल्याही फेरीचा निकाल सव्वा नऊपर्यंत आला नव्हता. निकालाला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढली आहे. पहिल्या फेरीमध्ये पिंपरी आणि चिंचवड मधून श्रीरंग बारणे यांची आघाडी असून मावळ विधानसभा मतदारसंघातून वाघेरे आघाडीवर आहेत. बारणे आणि वाघेरे यांच्यामध्ये चुरस असल्याचे दिसून येत आहे.

टपाली मतमोजणीने सुरुवात! 

टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ मतमोजणी टेबल होते. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावले असून एकूण ११३ टेबलवर मतमोजणी सुरू झाली.  

अशी आहे विधानसभानिहाय व्यवस्था...

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

विधानसभानिहाय मतमोजणी टेबलची रचना!

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी २४ टेबल लावण्यात आले असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील. उरण विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावले असून मतमोजणीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल लावले होते. एकूण २५ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून २३ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १६ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून २५ मतमोजणी फेऱ्या होतील.

Web Title: Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil Slow counting process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.